सुरज सोपान घुले यांची स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) पदी नियुक्ती..

वटपळी गावच्या शिरपेचामध्ये सुरज घुले यांनी मानाचा तुरा रोवला…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील वटपळी कोंडबावी येथील रहिवासी असलेल्या सुरज सोपान घुले यांची स्वच्छता निरीक्षक पदी (Sanitary Inspector) आज तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे नियुक्तीचे आदेश मा. सचिन ओंबासे जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचे हस्ते पारित करण्यात आले.
श्री. सुरज घुले हे वटपळी कोंडबावी, ता. माळशिरस, येथील रहिवासी असून त्यांचे M. A. English मध्ये शिक्षण पुर्ण झाल्यानंतर वडिल आणि दोन चुलते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी करून हे यश संपादन केले आहे. सुरज घुले हे वटपळी कोंडबावी येथील प्रगतशील शेतकरी श्री. सोपानकाका घुले यांचे चिरंजीव आहेत.


ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक श्री. महादेव घुले साहेब आणि कृषी विभागामध्ये कार्यरत असलेले श्री. राजेंद्र घुले साहेब यांचे पुतणे आहेत. आपल्या काकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी करून हे यश संपादन केले असल्याचे आणि एवढ्यावरच न थांबता पुढे अभ्यास चालूच ठेवणार, असल्याचे त्यांनी सांगितले. बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील परिवार यांचेकडून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.