ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

सुरेशआबा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा..

चाकोरे (बारामती झटका)

चाकोरे ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेशआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाकोरे गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर श्री. सुरेश आबा पाटील यांचा सर्व शाळा व अंगणवाड्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी चाकोरे-प्रतापनगर परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय चाकोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरावकेवस्ती आणि सर्व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य (क्वायर वही, पेन) व खाऊ वाटप करण्यात आला.

तसेच शिक्षक दिनानिमित्त गावातील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जीवनभैय्या उत्तमराव जानकर, स्वप्नीलभैय्या दत्ताप्पा वाघमारे, अजय सकट, गणेश इंगळे, डॉ. तुकाराम ठवरे, शामराव बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादासो पाटील (मा. चेअरमन सोसायटी) व विकी भैया पाटील, सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button