स्व. भारतनाना भालके यांनी विजयाच्या ठोकलेल्या शड्डूने शिवरत्नच्या कानठाळ्या बसून अजून कानात आवाज घुमत असणार…

गुन्हेगारी क्षेत्रात अग्रेसर नाव असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कायदा व सुव्यवस्थेच्या मीडियासमोर गप्पा मारणे म्हणजे, बालिश बहु बायकात बडबडला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
माळशिरस (बारामती झटका)
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे नाव न घेता पराभूत आहेत, जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका केल्यानंतर लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्या समर्थकांमधून अनेक टीकात्मक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य व तळागाळातील जनतेच्या मनातील असलेले स्वर्गीय भारतनाना भालके यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केल्यानंतर पंढरपूर येथून शड्डू ठोकलेला होता. शिवरत्नच्या कानठळ्या बसून मोहिते पाटील परिवारांच्या कानात अजून आवाज घुमत असणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गृह खाते असतानासुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात अग्रेसर नाव असणारे लोकप्रतिनिधी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या मीडियासमोर गप्पा मारणे म्हणजे बालिश बहु बायकात बडबडला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे.
माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा व विकास केलेले लोकप्रिय दमदार राम सातपुते यांना माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत एक लाख आठ हजाराच्या पुढे मताधिक्य मिळालेले आहे. जनतेने नाकारलेले नाही, उलट स्वीकारलेले आहे. मात्र, समोर मोहिते पाटील यांच्या तीन पिढीच राजकारण उमेदवाराचे 30-40 वर्षाचे राजकारण दोन्ही गट एकत्र येऊन प्रचंड दबाव दहशत असताना सुद्धा विकासप्रिय व आरोग्य दूत अशी गोरगरीब व सर्वसामान्य जनतेमध्ये ओळख असणारे राम सातपुते यांना मतदारांनी तळहाताच्या फोडासारखे जपलेले असल्याने शिवरत्नवरील मोहिते पाटील परिवार यांच्या जिव्हारी लागलेले आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त विधाने करून समाजामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र, सुज्ञ जनता येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखविणार असल्याचेही बोलले जात आहे.
विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, आपण भविष्यामध्ये काय करणार किंवा पाठीमागील केलेली काळी कृत्य यावर जनतेला विश्वास द्यावा. विजय मल्टीटेस्ट पतसंस्थेतील ठेवेदार व सभासदांचे पैसे, विजय शुगरमधील शेतकऱ्यांचे थकीत बिल, कामगारांचे पैसे, सुमित्रा पतसंस्थेचे ठेवीदारांचे पैसे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगार व शेतकरी सभासदांच्या ऊस बिलाबाबत पैसे, शिवामृत दूध उत्पादक संघाने दूध संस्थांची अनामत रक्कम घेतलेले पैसे, माळशिरस तालुक्यात एमआयडीसी का आली नाही ?, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची समाज माध्यमांसमोर पीडित व गोरगरीब जनतेला समोर घेऊन जनता दरबार घ्यावा आणि जनतेचे प्रश्न निकाली काढावे. असे अनेक प्रश्न आ वासून पहात असताना आमदार राम सातपुते यांच्या पराभवावर बोलणे उचित नाही. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, युवा नेते संग्रामसिंह मोहिते पाटील अशा आपल्या परिवारातील सदस्यांचा पराभव झालेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील ऊसतोड मजूर कामगाराचा पोरगा राम सातपुते यांचा पराभव झाला, असे सांगताना सुद्धा जनाची नाही मनाची तरी वाटायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी माळशिरस तालुक्यातील जनता ठाम आहे. येणाऱ्या अकलूज नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ताकद दाखवून दिली जाईल, अशा अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.