स्व. राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशिय दिव्यांग संस्थेच्या वतीने तरंगफळ येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा
तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस, येथील स्व. राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग संस्था अखंड २७ वर्ष जागतीक दिव्यांग दिन साजरा करते. यावर्षीही दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तरंगफळ गावच्या विद्यमान सरपंच पद्मिनी नारायण तरंगे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीनाथ विद्यालयाचे प्राचार्य संतोषकुमार आबासाहेब शेंडगे हे होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरवे सर यांनी केले. यावेळी बोलताना संतोष शेंडगे सर यांनी संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगितले. ज्यावेळी संस्थेची स्थापना केली त्यावेळी सोलापूरला, मुंबईला काम करत असताना अनेक वेळा त्यांनी वडापाववर दिवस काढले. गोरख जानकर शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व, ज्यांनी गेली सत्तावीस वर्ष दिव्यांगांची सेवा करण्यात घालवले आणि श्वासातश्वास असेपर्यंत दिव्यांगाची सेवा करत राहतील, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना संबोधताना दिला. त्यांच्या प्रत्येक कार्याचा मी साक्षीदार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखून ठेवलेला असतो. राज्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीने तो निधी वाटप केलेला नव्हता. गोरख जानकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन बच्चुभाऊ कडू यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आदेश दिले. अशा प्रकारची अनेक कामे त्यांनी मार्गी लावली. गोरख जानकर यांच्या माध्यमातून तरंगफळ गावाला एक हिरा मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली व त्यांच्या आईचे आभार व्यक्त केले.
त्याच बरोबर स्व. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्था, अकलूजचे व्हा, चेअरमन सुजित तरंगे यांनी संबोधताना सांगितले, या संस्थेचं छोटसं रोपट लावलं होतं, त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले. या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात अनेक गरजू अपंगांना कुबड्या वाटप, सायकल वाटप, श्रवण यंत्र वाटप, चष्मे वाटप अशा प्रकारच्या दिव्यांगांना लागणाऱ्या वस्तूंचे या संस्थेच्या माध्यमातून गेली सत्तावीस वर्षे वाटप होत आहे. त्याचप्रमाणे गेली सत्तावीस वर्ष तरंगफळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडे वस्ती, श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स तरंगफळ या शाळेतील मुलांना दरवर्षी शालेय साहित्य व खाऊ वाटप केला जातो, अशा प्रकारचे सामाजिक कार्य संस्था करीत असते.
त्याचप्रमाणे आभारपर बोलत असताना संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांनी सांगितले की, दिव्यांगांना कमी न लेखता त्यांना सोबत घेऊन सर्वांनी त्यांना समानतेची वागणूक द्यावी. दिव्यांग सुद्धा कमी नसून आज रोजी क्लास वन पासून ते शेतकरी वर्गापर्यंत दिव्यांग काम करत आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून अनेक दिव्यांग लोकांचे जीवन उंचवण्याचे कार्य मी केले. अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना नोकरी लागेपर्यंत त्यांना सहकार्य केले आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी दिव्यांग लोकांना सहकार्य व मदत करत राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमाची सांगता शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तरंगफळ गावच्या विद्यमान सरपंच सौ. पद्मिनीताई नारायण तरंगे, नारायण तरंगे, तरंगफळ गावचे ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे भाऊसाहेब, तरंगफळ गावचे डेप्युटी सरपंच विक्रम बागाव, रत्नप्रभादेवी बीज उत्पादक सहकारी संस्था अकलूज चे व्हाईस चेअरमन सुजितदादा तरंगे, नानासाहेब कांबळे, शंकर वलेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब गोरड, माजी डीपी सरपंच शशिकांत साळवे, कुलदीप जानकर, विकास जानकर, आबासाहेब तरंगे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक इरकर सर, मुलाणी सर व शिक्षक वृंद, तसेच अंगणवाडीच्या सर्व सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अशा पद्धतीने दिव्यांग दिन उत्साहात साजरा झाला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Glue Dream strain I am truly thankful to the owner of this web site who has shared this fantastic piece of writing at at this place.