स्वाभिमानी पानिवकर पाटील मोहिते पाटलांशी हात मिळवणी करून साथ करणार नाही, कार्यकर्त्यांना विश्वास..

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय शामराव पाटील उर्फ भाऊ यांच्या स्वाभिमानी विचाराचा वारसा पानीवकर पाटील व कार्यकर्ते जपतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून प्रस्थापितांचे राजकारण उध्वस्त करून स्वाभिमानाने माळशिरस तालुक्याला राजकारण शिकवणारे माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय शामराव पाटील उर्फ भाऊ यांच्या स्वाभिमानी विचाराचा वारसा काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील व पानिवकर पाटील आणि कार्यकर्ते स्वाभिमान जपतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्वाभिमानी पानिवकर मोहिते पाटील यांच्याशी हात मिळवणी करून राजकीय साथ करणार नाहीत, असा कार्यकर्त्यांमधून विश्वास व्यक्त केला जात आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व शामराव पाटील यांचे राजकीय वैर महाराष्ट्रालाच नव्हे तर देशात माहित आहे. मोहिते पाटील परिवार यांचेकडून जाणीवपूर्वक पानिवकर पाटील यांना नाहक त्रास दिलेला आहे.
प्रतिकूल परिस्थितीत पानिवकर पाटील यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधाला भिक न घालता माळशिरस तालुक्यात श्रीराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात जाळे निर्माण केलेले आहे. पानिव व पंचक्रोशीत पानिवकर पाटील यांनी कार्यातून कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत. तालुक्याच्या राजकारणात पानिवकर पाटील यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केलेले आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा अनेक निवडणुकांमधून आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केलेले आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर तर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये लढत लागलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेसमध्येच प्रकाश बापू पाटील आहेत मात्र, धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळविलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील माळशिरस तालुक्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते सक्रिय झालेले नाहीत. मोहिते पाटील व पानिवकर पाटील एकत्र येतील, अशा सोशल मीडियावर वावड्या उठत आहेत. खऱ्या अर्थाने पानिवकर पाटील स्वाभिमानी विचाराचा वारसा जपत असल्याने मोहिते पाटील यांनी यापूर्वी केलेला त्रास, जाणीवपूर्वक केलेल्या अडचणी विसरणार नाहीत. स्वाभिमानी पानिवकर मोहिते पाटलांशी हात मिळवणी करून साथ करणार नाहीत, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून बोलला जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.