ताज्या बातम्याराजकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटना न संपणारी चळवळ; शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी वटवृक्ष आहेत…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वावड्या उडवणारांनी वावडीला संघटनेचा शेपूट नसल्याने गोचीच खाणार….

माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त

माळशिरस (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटना न संपणारी चळवळ आहे. शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी संघटनेचा वटवृक्ष तयार केलेला आहे. आजपर्यंत संघटनेने खासदार, आमदार, मंत्री अशा सामान्य शेतकऱ्यांच्या पोराला नेता बनवणारा राजू शेट्टी यांची संघटना कारखाना आहे, अशी संघटनेची ओळख आहे. आजपर्यंत संघटनेत किती आले, किती गेले, तरी संघटनेचे कार्य जोमाने सुरू आहे. निसर्गाचा नियम आहे, गोमीचा एक पाय मोडला अथवा निकामी झाला म्हणून गोम चालायची थांबत नाही. तसाच एखादा पदाधिकारी संघटनेतून गेला म्हणून चळवळ थांबत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नसणाऱ्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वावड्या उडवणार आणि वावडीला संघटनेचा शेपूटच नसल्याने गोचीच खाणार, अशी अवस्था स्वाभिमानी संघटनेत नसणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांची झालेली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक बारामती येथे दि. 22 जून व 23 जून रोजी पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक शेतकऱ्यांचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आलेली होती.

माळशिरस तालुक्यात लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते, पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाबरोबर दिसून आले असल्याने माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तालुका कार्यकारणी तातडीने बरखास्तीचा निर्णय घेण्यात आलेला होता.

त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन नूतन कार्यकारणी माळशिरस तालुका दौरा करून लवकरात लवकर नवीन निवडी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारणी बरखास्त आहे. तालुक्यात कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे संघटनेचे पद नाही.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

8 Comments

Leave a Reply

Back to top button