स्वाभिमानी संघटनेचे वकील कट्टर शिलेदार ॲड. सिताराम झंजे यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वप्नपूर्ती केली.
खुडूस (बारामती झटका)
खुडूस ता. माळशिरस, गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सिताराम झंजे यांनी प्रतिकूल परिस्थितीत वकिली पूर्ण करून समाजामध्ये विधी व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. माणसाच्या आयुष्यामध्ये लग्न आणि घर या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ॲड. सिताराम झंजे यांनी आई-वडिलांच्या स्वप्नातील घर बांधून स्वप्नपूर्ती केलेली आहे. चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना अडचणीच्या काळात मदत करीत असतात. जगाचा पोशिंदा शेतकरी या शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी चळवळीमध्ये काम करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वकील व कट्टर शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब यांचासुद्धा शेतकरी आंदोलनातील माळशिरस न्यायालयात विना मोबदला जामीन करून दिलेला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या खांद्याला खांदा लावून संघटनेमध्ये काम करणारे ॲड. सिताराम झंजे यांनी चळवळ येथील कार्यकर्त्यांचे न्यायालयीन कामकाज विमा मोबदला पहात आहेत. अशा कट्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार ॲड. सिताराम झंजे यांच्या स्वप्नपूर्ती मनातील घर पूर्ण केलेले आहे. त्यांच्या वास्तुशांती कार्यक्रमास चळवळीमधील अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माढा लोकसभेचे विकासप्रिय नेतृत्व ॲड. सोमनाथ (अण्णा) वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर (भैय्या) सुळ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आंदोलन वीर अजित (भैय्या) बोरकर, शिवसेनेचे वीरेंद्र (आण्णा) वाघमारे, डोंबाळवाडीचे सरपंच सुरेश ठवरे, स्वाभिमानी संघटनेचे मार्गदर्शक, डॉ. सचिन शेंडगे, दादासाहेब काळे, बलीराम झंजे, विलास काळे, प्रदीप पाटील, विजय वाघबंरे, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.