स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख व जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश

बारामती (बारामती झटका)
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व किसान मोर्चाच्या पूजा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी मा. खा. श्रीनिवास पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस नसीम सिद्दीकी, अभिजीत पाटील, श्रीमती विद्याताई लोळगे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. कमलाकर माने देशमुख यांची शेतकरी आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी व मदनसिंह जाधव यांची शेतकरी आघाडी महाराष्ट्र सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्ताने माढा व सोलापूर लोकसभेचा उमेदवार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचा करण्याचा व शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना योग्य न्याय, मालाला हमीभाव देण्याचा, शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी कमलाकर माने देशमुख यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार गावागावात पोहोचवणार आहे असे सांगितले. तर येणाऱ्या लोकसभेला पूर्ण ताकतीने काम करून माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून आणू, असे मदनसिंह जाधव यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब धाईंजे, मोहन मगर, संजय मगर, उदय माने देशमुख, दीपक माने देशमुख, लक्ष्मण माने देशमुख, अमित माने देशमुख, नितीन सूर्यवंशी, जवान माने देशमुख, शिवाजी माने देशमुख, सतीश पिसे, आदेश पताळे, भाऊ साठे, अमित देशमुख, विशाल जाधव, अजित जाधव मानसिंग बोधले, ओंकार जाधव, अभिजीत शिंदे, असलम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.