अकलूज येथील रत्नाई कृषि महाविद्यालयाचा ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा बावडा येथे संपन्न

बावडा (बारामती झटका)
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत येणाऱ्या रत्नाई कृषि महाविद्यालय, अकलूज अंतर्गत दि. 9 डिसेंबर रोजी गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. महाविद्यालयाच्या वतीने येथे कृषि कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषिदुतांनी गावातील शेतकरी बांधवांना शेतीमधील नवीन माहिती देण्यात येईल असे सांगितले. आणि शेतकरी बांधवांना पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत थोडक्यात माहिती दिली.
यावेळी मा. सौ. पल्लवी गिरमे (सरपंच), मा. श्री. रणजीत घोगरे (उपसरपंच), मा. सौ. अंबिका पावसे (ग्रामसेवक), अक्षय कुंभार (कृषिसहायक अधिकारी), ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रगतशील शेतकरी आणि समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. कृषीकन्या साक्षी बोराटे, सुनैना जाधव, प्रतीक्षा जाधव, श्रद्धा जाधव, श्रद्धा इंगोले, अनामिका कोळेकर, प्राची कोंढाळकर, कीर्ती कोळी यांनी सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमास प्राचार्य आर. जी. नलावडे (प्राचार्य, रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज), एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) व प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी), प्रा. एच. वी. खराडे (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



