स्वसंरक्षणासाठी कराटे खेळणे ही काळाची गरज – लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे पुणे या ठिकाणी झालेल्या खुल्या राज्यस्तरीय कारटे स्पर्धेमध्ये टीकेबी तायकंदो कराटे क्लब, माळशिरस यांनी प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते बोलत होते.


यावेळी पुढे बोलताना लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते म्हणाले कि, अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये खेळाडू तयार व्हावेत, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचाच भाग म्हणून नमो चषक सारखी स्पर्धा देशभर आयोजित करून गुणवंत खेळाडू निर्माण झाले पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. अशा प्रकारे गोल्ड मेडल मिळाल्यानंतर सन्मान झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे, खेळाडूंचे मनोबल वाढते. माळशिरसमध्ये कराटे खेळाडू निर्माण होण्यासाठी सर्वते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या सन्मानाचे आयोजन नितीन कुमार थिटे यांनी केले होते. या वेळी बोडरे महाराज यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाला नूतन संचालक मिलिंद कुलकर्णी, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, नगरसेवक सचिन वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, दिलीप वाघमोडे, तलाठी सचिन पाटील आदी मान्यवरांसह पालक व खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.