स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान मध्ये माळशिरस तालुक्यातील महिलांनी सहभाग घ्यावा..

माळशिरस (बारामती झटका)
माननीय पंतप्रधान भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा हाच संकल्प, भारत हीच प्रेरणा’ या संकल्पनेतून स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाची सुरुवात करून देशाच्या आरोग्य परिस्थितीत बदल देशभरात समर्पित आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिरांच्या आयोजन आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचे उद्घाटन व प्रधानमंत्री मातृवंदन योजने अंतर्गत मातृत्व लाभाचे आयोजन करण्यासाठी दि. 17 सप्टेंबर 25 ते दि. 2 ऑक्टोबर 25 या कालावधीमध्ये निवडक आरोग्य संस्थांमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर श्री कुलदीप जंगम साहेब, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर डॉ. संतोष नवले साहेब व माननीय गटविकास अधिकारी श्री. रघुनाथ पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात सदर अभियानांतर्गत निवडक आरोग्य संस्थांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आठवड्यातून एक व उपकेंद्र स्तरावरून आठवड्यातून दोन असे एकूण 301 शिबिर आयोजित केली असून सदर शिबिरामध्ये महिलांसाठी खालील सेवा दिल्या जाणार आहेत –
1 महिलांची एनसीडी तपासणी ज्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, ग्रीवाचा कर्करोग तपासणी
2 असुरक्षित महिलांसाठी क्षयरोग तपासणी
3 किशोरवयीन मुली व महिलांसाठी अशक्तपणाची तपासणी आणि समुपदेशन सेवा
4 आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल स्क्रीनिंग कार्ड वितरण व समुपदेशन
5 गर्भवती महिलांसाठी तपासणी व इतर सेवा
6 बालकांची लसीकरण सेवा
7 किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता व पोषण यावरती सत्रे
8 महिला स्वयंसेवी गट आणि पंचायत राज संस्थांच्या महिला प्रतिनिधीद्वारे तेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर मोहीम
9 पोषण समुपदेशन व कल्याण सत्र रक्तदान शिबिर पी एम जे वाय अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान कार्डची वाटप निक्षय मित्र नोंदणी अवयव दान नोंदणी इत्यादी सेवा व नोंदणी करण्यासाठी शिबिरे तालुक्यात आयोजित केले आहे व सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी अशा गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका यांनी योग्य नियोजन करून जास्तीत जास्त लाभ देण्याचा संकल्प केला असून सदर योजनेसाठी सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रियांका शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस यांनी केले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



