ताज्या बातम्या

स्वतःच्या जीवाची परवा न करता लहान मुलाला पाण्यातून बाहेर काढून वाचविण्यात यशस्वी…

विझोरी (बारामती झटका)

स्वतःच्या जीवाची परवा न करता कॅनलमध्ये पाण्यात पडल्यानंतर अडकलेल्या मुलाला बाहेर काढून वाचविणारे श्री. सागर जगदाळे यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. त्यानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष तथा पिसेवाडी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष व धाडसी सदस्य साहिलभैय्या आतार व मित्रपरिवार यांनी सन्मान करून केलेल्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव केलेला आहे.

निमगाव पाटी येथील विझोरीकडून विजयवाडीकडे जाणाऱ्या कॅनॉलमध्ये नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी महिला आलेल्या होत्या. विजय हनुमंत कुंभार रा. खुडूस, यांचा दहा वर्षाचा हर्षद विजय कुंभार प्रगती स्कूल , दहिगाव येथे शिकत आहे. लहान मुलगा पाण्यात पायऱ्यावर खेळत होता. खेळता खेळता पाण्याच्या प्रवाहात आल्यामुळे वाहत चालला. आईने पाहिल्यानंतर आईने पाठीमागून उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने जवळच पुणे-पंढरपूर महामार्ग असल्याने सदरच्या रस्त्यावरील पूल होता.

सदरच्या पूलला तारा असल्याने महिला त्यामध्ये अडकली गेली. मुलाचा व आईचा आकांत सुरू झाला. पाहणाऱ्यांची गर्दी होती मात्र, उडी मारून वाचवणारा कोणी नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून श्री. सागर जगदाळे यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता पाठीवरील दप्तर खाली ठेवले आणि कॅनलमध्ये उडी मारली. प्रवाह वाहत असल्याने मुलाला घेऊन बाहेर येणे अवघड होते. अशा कठीण परिस्थितीत तारेचा आधार घेऊन मुलाला पाठीवर घेऊन सागर यांनी कॅनल पास केला. नंतर पाण्यातून आईला असेच काढण्यात आले. सागर वेळीच पोचले नसते तर अनर्थ घडला असता. वेळीच धाडस दाखवले असल्याने लहान मुलाला जीवदान मिळालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button