चि. रोहन निकम शेरेवाडी, दहिगाव आणि चि. सौ. कां. अंकिता फडतरे इंजबाव यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

श्री. विष्णू निकम, शेरेवाडी दहिगाव आणि श्री. विलास फडतरे, इंजबाव यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार…
दहिगाव (बारामती झटका)
श्री. किसन तुकाराम निकम यांचे नातू व श्री. विष्णू किसन निकम रा. शेरेवाडी (दहिगाव), ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. रोहन (MBA, B.Sc. Agri.) आणि कै. पांडुरंग बाबुराव फडतरे यांची नात व श्री. विलास पांडुरंग फडतरे रा. इंजबाव, ता. माण, जि. सातारा यांची सुकन्या चि. सौ. कां. अंकिता (B.Sc. Chem.) यांचा शाही शुभ विवाह सोहळा शनिवार दि. २२/११/२०२५ रोजी १ वाजून ७ मि. या शुभ मुहूर्तावर चैतन्य मंगल कार्यालय, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण, सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचं नाजूक उन्मीलन, सासर माहेरच्या नात्याची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण, यासाठी हवा शुभाशीर्वाद व शुभेच्छांची सुखद रम्य पाखरण, म्हणूनच या शुभविवाहाचे आग्रहाचे व अगत्याचे निमंत्रण सौ. इंदुबाई किसन व श्री. किसन तुकाराम निकम, सौ. सुनंदा, विमल विष्णू व श्री. विष्णू किसन निकम यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त निकम व फडतरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



