ताज्या बातम्याराजकारण

या शेजाऱ्याने बरं नाही केलं रं गड्या…., मला तुतारी वाजवायला न्हेलं रं गड्या…., अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ हर्षुभाऊवर आली आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कमळाच्या पाकळ्यात ऐशोआरामात झोपलेले असताना शेजाऱ्याने कानात तुतारी वाजवून कायमची झोप मोड केली.

इंदापूर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. भारतीय जनता पक्षाने त्यांना मानसन्मान दिलेला होता. भाजपमध्ये गेल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी प्रसार माध्यमांना बोलताना आत्ता आरामात झोप लागत असल्याचे सांगितले होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कमळाच्या पाकळ्यात ऐशोआरामात झोपलेले असताना शेजाऱ्याने कानात तुतारी वाजवून कायमची झोप मोड केली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. निवडणुकीनंतर या शेजाऱ्याने बरं नाही केलं रं गड्या…., मला तुतारी वाजवायला न्हेलं रं गड्या….., अशी म्हणण्याची दुर्दैवी वेळ हर्षुभाऊ यांच्यावर आलेली असल्याची दबक्या आवाजात इंदापूर परिसरात चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. मराठा आंदोलनाची धग होती, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 400 पार नारा दिलेला होता. त्याचा विरोधकांनी वेगळा अर्थ करून संविधान बदलण्याची अफवा पसरवलेली होती. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा हमीभाव, जीएसटी असे अनेक वेगवेगळे विषय करून शेतकरी, व्यापारी यांच्या मनामध्ये सरकारविषयी द्वेष पसरवलेला होता.

महाविकास आघाडीच्या सरकारमधील एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केलेली असल्याने गद्दार खोकेबाज अशी टीका टिप्पणी करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केलेला होता. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकसभेला जागा जास्त आलेल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील विशेष करून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फाजील आत्मविश्वास वाढत गेला. भाजपमधील अस्तनीतील निखारे सुद्धा भाजपच्या ध्येयधोरणाची पायमल्ली करताना महाराष्ट्राने पाहिलेले आहे. लोकसभेनंतर महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मायक्रो नियोजन केलेले होते तरीसुद्धा, कित्येक जणांनी या नेत्यांना सोडून महाविकास आघाडीत विशेष करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल, अशी रस्त्यावरील नेते व कार्यकर्ते यांच्यामुळे चौकाचौकात चर्चेला उधाण आणलेले होते. मतदार मात्र स्थिर होता.

इंदापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या उमेदवारीवर महायुतीकडून शिक्कामोर्तब झालेला होता. अशावेळी शेजारच्या नेतेमंडळींनी हर्षवर्धन पाटील यांच्या हातात तुतारी देऊन वाजवायला सांगितली आणि हर्षुभाऊ यांची कायमची झोपमोड केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण, हर्षवर्धन पाटील यांना केंद्रातील सहकार खात्याचे अध्यक्ष पद देऊन मान सन्मान दिलेला होता. तरीसुद्धा शेजाऱ्यांच्या भूलथापाला हर्षुभाऊ बळी पडले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

18 Comments

Leave a Reply

Back to top button