तामशिदवाडी, वाघमोडे वस्ती येथे जागरण व गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन

तामशिदवाडी (बारामती झटका)
तामशिदवाडी ता. माळशिरस, येथे वाघमोडे पाटील परिवाराच्या वतीने जागरण व गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. १०/११/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता तामशिदवाडी नजीक ४६ फाटा, वाघमोडे वस्ती, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. यावेळी श्री. संतोष हिवरे वाघेमंडळ पार्टी, पुरंदावडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. सुंदर व श्री. बंडू पांडुरंग वाघमोडे पाटील, सौ. केशर व श्री. खंडू पांडुरंग वाघमोडे पाटील, सौ. सरस्वती व श्री. किसन पांडुरंग वाघमोडे पाटील, सौ. अनुसया व श्री. बळवंत पांडुरंग वाघमोडे पाटील, सौ. अलका व श्री. विष्णू पांडुरंग वाघमोडे पाटील, सौ. इंदुमती व श्री. रावसाहेब साधू वाघमोडे पाटील, सौ. नंदिनी व श्री. विठ्ठल साधू वाघमोडे पाटील, सौ. सविता व श्री. प्रमोद मारुती वाघमोडे पाटील यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

तरी घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करण्याचे आवाहन समस्त वाघमोडे पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.