तांदुळवाडी आणि पंचक्रोशीचे योगदान अविस्मरणीय – खा. धैर्यशील मोहिते पाटील
विजय पवार मित्रपरिवाराच्या वतीने खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचा भव्य दिव्य सन्मान
अकलूज (बारामती झटका)
तांदुळवाडी आणि पंचक्रोशीतील लोकांनी नेहमीच मला बळ दिले आहे. सहकार महर्षींच्या काळापासूनचे ऋणानुबंध आजही येथील लोक जपताना दिसतात त्यामुळे या परिसराचे योगदान अविस्मरणीय आहे, असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे विजय पवार मित्रपरिवार व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने तांदुळवाडी गणातून पंचायत समिती सदस्य झालेले आणि आता खासदार झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भव्य मिरवणुकीचे व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला तांदुळवाडी बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर ही मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी याचे सभेत रूपांतर झाले. सभास्थळी प्रतिमापूजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार महर्षी कारखान्याचे संचालक ॲड. विजय पवार यांनी केले. यामध्ये त्यांनी तांदुळवाडी आणि परिसराच्या विकासकामांबाबत मोहिते पाटलांचे योगदान याविषयी भाष्य केले. तदनंतर खासदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय पवार युवा मंचच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने खा. मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विलास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते मार्गदर्शक चंद्रकांत पवार, पैलवान दत्ता मगर, दत्तात्रय आवताडे, दादासाहेब शिंगाडे, धनु दुपडे, भुजंगराव शिंगाडे, तुकाराम पाटील, प्रसाद दुपडे, नागनाथ दुपडे, संचालक रामभाऊ चव्हाण, कारखेलचे सरपंच शशिकांत गायकवाड, अशोक आसबे, रावसाहेब आवताडे, अरविंद जाधव, महेश काळे, विश्वनाथ मगर, भाळवणीचे सरपंच रणजित जाधव, गणपत उघडे, बाळ निंबाळक, रत्नप्रभादेवी बिजोत्पादक संस्थेचे चेअरमन श्रीकांत देशमुख, उदय पाटील, शशीकांत कदम, ॲड. नागेश काकडे, नवनाथ निलटे, बाबा पाटील, हनुमंत निलटे, कैलास कदम, प्रमोद निंबाळकर, मच्छिंद्र जाधव, अमोल राऊत, दादा बाबर, हर्षवर्धन काकडे, मोहन शिंदे आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना खा. मोहिते पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ते खासदार पदापर्यंतचा प्रवास सांगितला व यामध्ये तांदूळवाडीकरांचे योगदान त्यांनी व्यक्त केले. विकासासाठी प्रत्येकाने हक्काने यावे. मी प्रत्येकासाठी चोवीस तास उपलब्ध आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार प्रल्हाद भोसले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्जेराव चव्हाण, अजित कदम, विश्वजीत दुधाट, रवि दुधाट, तानाजी कदम, रणजित पवार, वृषभ आसबे, माधव उघडे, आदित्य दुधाट, समाधान कदम, गणेश उघडे, बापू राजगुडे, शहाजी निलटे, विश्वजीत कदम, अवदुत चव्हाण, माऊली सुरवसे, पप्पू दुधाट, विलास कदम, शुभम बांदल, आरिफ मुलाणी, हर्षवर्धन तनपुरे, बबलू पारवे आदीसह विजय पवार मित्र परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील लोकांनी अलोट गर्दी केली होती.
जेसीबीतून फुलांचा वर्षाव…आणि हत्ती…
जेसीबीतून फुलांचा होणारा वर्षाव, डीजेच्या आवाजावर थिरकणारी पावले, मिरवणुकीत असणारा भव्यदिव्य हत्ती, हलग्यांचा गगनभेदी निनाद आणि धैर्यशील मोहिते पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..च्या घोषणा… अशा उत्साही वातावरणात तांदुळवाडी आणि पंचक्रोशीतील लोकांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्वागत केले आणि भव्य दिव्य मिरवणूक काढली.
येणाऱ्या अधिवेशनात आरक्षणावर बोलणार…
नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये काही तांत्रिक कारणामुळे आरक्षणाविषयी बोलू शकलो नाही. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये येणाऱ्या अधिवेशनात आरक्षणावर बोलणार आहे. या संदर्भात विविध तज्ञांची मते जाणून घेतली आहेत. खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. त्यामुळे पुढील अधिवेशनात आरक्षण प्रश्नावर बोलणार आहे, असे यावेळी खा. मोहिते पाटील यांनी मत व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Your blog is a constant source of inspiration for me. Your passion for your subject matter is palpable, and it’s clear that you pour your heart and soul into every post. Keep up the incredible work!