ताज्या बातम्यासामाजिक

तांदुळवाडी येथील श्रीमती सोनाबाई हनुमंत मिले यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन

तांदुळवाडी (बारामती झटका)

मौजे तांदुळवाडी, ता. माळशिरस येथील ह. भ. प. मृदंग वादक कै. हनुमंत रंगनाथ मिले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सोनाबाई हनुमंत मिले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. 19/4/2025 रोजी राहत्या घरी निधन झाले.

श्रीमती सोनाबाई मिले यांचे माहेर हे वाघोली येथील माने शेंडगे परिवारातील असून त्या मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य शिवश्री उत्तमराव दत्तात्रय माने शेंडगे यांच्या सासुबाई असून त्यांच्या पश्चात सेवानिवृत्त एसटी डेपो मॅनेजर नवनाथ मिले (मुलगा), भजन सम्राट श्री. बिभिशन मिले (मुलगा), जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारणी सदस्या अक्काताई माने शेंडगे (मुलगी), तसेच सुना, नातू, नाती, नातसुना, परतवंडे असा परिवार असून राहत्या घराच्या समोर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. श्रीमती सोनाबाई मिले ह्या सांप्रदायिक मार्गातील व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. सदरवेळी मिले परिवाराचे पै-पाहुणे तांदुळवाडी तील ग्रामस्थ, तसेच मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिसरा म्हणजे अस्थी विसर्जन दि.21/4/2025 रोजी सकाळी 7 वा. त्याचे घरासमोर होणार आहे.

कै. सोनाबाई हनुमंत मिले यांच्या दुःखद निधनाने मिले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर कै. सोनाबाई मिले यांच्या आत्म्यास शांती देवो व मिले परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button