ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

तरुण पिढीने महापुरुषांच्या स्थळांना भेट देऊन प्रेरणा व ऊर्जा घेऊन व्यसनापासून दूर रहावे – सत्यशोधक ढोक

फुले जयंतीदिनी फुले एज्युकेशन तर्फे समस्त ग्रामस्थ चऱ्होली बुद्रुक सन्मानित

पुणे (बारामती झटका)

थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंती निमित्ताने फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन तर्फे फुले जयंती दिनी पहाटे ६ वा. समस्त ग्रामस्थ आणि सावता माळी मंडळ, चऱ्होली बुद्रुक पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला. दरवर्षी महात्मा फुले जयंतीनिमित्त फुले वाडा ते चऱ्होली पायी मशाल ज्योत नेऊन गावात भव्य मिरवणूक काढून गुणवंत व उच्चशिक्षित, UPSC, MPSC, पास विद्यार्थी, पालक यांचा सत्कार सोहळा, मर्दानी खेळ, सोबत समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करतात. म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळे भेट देऊन सन्मान करण्यात येतो.

यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की, नवीन पिढीने व्यसनाच्या आहारी न जाता महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी दिनी फुले वाड्यासारख्या स्थळांना भेट देऊन त्यांची प्रेरणा, ऊर्जा घेऊन सामाजिक कार्य करावे. फुले दाम्पत्य यांनी विविध प्रकारचे कार्य करून आपल्याला दिशा दिली आहे. त्याच दिशेने किंवा वाटेने काम केले तरी आत्मिक व देश सेवा केल्याचे समाधान मिळेल असे सांगितले आणि आपण सर्वजण याच दिशेने कायम कार्य करीत असता, हे मी प्रत्यक्ष स्वतः डोळ्याने पाहिले आहे. आपण यासोबत आधुनिक काळाची गरज म्हणून सत्यशोधक विवाह देखील लावावेत त्यासाठी आमची संस्था विधी कार्य मोफत करेल असे देखील म्हटले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सत्यशोधक ढोक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मशाल ज्योत प्रज्वलीत करण्यात आली आणि संपूर्ण फुले वाड्याला मशाल ज्योतीने महापुरुषांच्या नावे जयघोष करीत शेवटी ढोक यांचे पाठोपाठ सत्याचा अखंड सर्वांनी म्हटला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom