तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत जबाबदार असणारा अहवाल लाल फितीत अडकला…

सध्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार पदभाराची व उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीची चौकशी जनतेतून मागणी….
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परमेश्वर मारुतीराव राऊत यांच्या कार्यकालात सण 2019 च्या सरळ सेवा भरतीच्या जाहिरातीच्या वेळी संबंधित मान्यता प्राप्त संवर्गात घोषित करण्यात आलेल्या संवर्गनिहाय बिंदू नामावलीच्या घोषवारानुसार गट क संवर्गात संवर्गनिहाय एकूण रिक्त पदेही 534 पदे रिक्त होती. त्यानुसार दहा टक्के आरक्षणानुसार स वर्ग निहाय एकूण 53 पदेही दि. 24/5/2021 च्या नियुक्ती वेळी प्रचलित शासन निर्णयातील तरतुदीनुसार व पत्रानुसार भरणे अपेक्षित होते. परंतु, दि. 24/5/2021 च्या ग्रामपंचायत कर्मचारी भरती वेळी एकूण 141 पदे भरण्यात आली होते. म्हणजेच 88 पदेही सन 2021 मध्ये अतिरिक्त भरण्यात आलेली होती. तत्कालीन अधिकारी कर्मचारी यांनी अनिमित्त केली आहे. अनिमित्त करणारे संबंधित अधिकारी यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली होती. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा प्राप्त करून घेतलेला होता. पुढील कार्यवाही अंतिम टप्प्यात होती ती कार्यवाही लाल फितीत गुंडाळून ठेवली आहे का ? परमेश्वर राऊत यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून दाबून ठेवलेली आहे का ? अशी सोलापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
शासकीय अधिकारी परमेश्वर मारुतीराव राऊत (Add. CEO) यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याबाबत सोलापूर, परभणी, नंदुरबार जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे. श्री. परमेश्वर मारुतीराव राऊत, सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद नंदुरबार येथे बदली झालेले आहेत. तथापि, त्यांनी बदलीनंतर चार्ज घेतल्यानंतर त्याच दिवशी रजेचा अर्ज देऊन दीर्घकाळ सेवेत अनुपस्थित राहिलेले आहेत. अशी माहिती समोर येत आहे.
सदर अधिकारी मागील सुमारे ८ महिन्यांपासून प्रत्यक्ष कामावर उपस्थित नसताना देखील मोठ्या प्रमाणात मालमत्ता व आर्थिक व्यवहार करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडे व त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावावर खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याची माहिती आहे.
संशयास्पद मालमत्ता
हडशी येथे प्रॉपर्टी,
पनवेल (नवीन विमानतळ परिसर) येथे प्रॉपर्टी,
प्रतापगड पायथा येथे प्रॉपर्टी, महाबळेश्वर येथे प्रॉपर्टी, कोल्हापूर येथे नवीन प्रॉपर्टी एक्स्पोर्ट व्यवसायात मोठी रोख गुंतवणूक….
नातेवाईकांच्या नावावरील मालमत्ता
रचना परमेश्वर राऊत (पत्नी – गृहिणी)
बालाजी मारुती राऊत (भाऊ – शेतकरी)
बाबाराव गोरे (सासरे – हार्डवेअर व्यवसाय, नांदेड)
रत्नप्रभा बाबाराव गोरे (सासू – गृहिणी)
मारुतीराव राऊत (वडील)
तन्मय राऊत (भाचा – विद्यार्थी)
इतर मालमत्ता
Jeep Meridian MH-05-FG-8508 – बालाजी राऊत
Business Square 401 व 501, शिवाजीनगर पुणे
सोलापूर-विजापूर हायवे लगत ४७ एकर बागायत जमीन व बंगला
व्यंकटेश लार्का – 3000 sq.ft. प्लॉट
कोलाड येथे 20 एकर जमीन व बंगला
नवी मुंबई पालम बीच रोड – 2 BHK फ्लॅट
रोहा सुतारवाडी येथे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प
एकवीरा उद्योग समूहात पार्टनरशिप.
वरील सर्व मालमत्ता ही त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचा संशय असून Prevention of Corruption Act, 1988 तसेच Benami Transactions (Prohibition) Act, 1988 अंतर्गत गंभीर गुन्हा ठरू शकतो. म्हणून विनंती सदर अधिकाऱ्यांची संपूर्ण मालमत्ता चौकशी (Disproportionate Assets Inquiry) करावी.
त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावरील सर्व मालमत्तेची तपासणी करावी. आवश्यक असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व आर्थिक तपास यंत्रणा मार्फत गुन्हा नोंद करावा.
चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना प्रशासकीय पदावरून दूर करावे. अशी सर्वसामान्य जनतेची भावना झालेली असून सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे प्रधान सचिव ग्रामविकास विभाग आयुक्त लाच लुचपत प्रतिबंधक विभाग संचालक सो. enforcement directorate..
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची चर्चा सुरू आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



