टेंभूर्णी येथे छत्रपतींच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने होणार रस्ता रोको…
राष्ट्रीय अस्मितेच्या सुरक्षेसाठी, कायदा लागू करण्यासाठी होणार आंदोलन
टेंभूर्णी (बारामती झटका)
भारतीय संविधानाने राष्ट्रीयपुरुष आणि प्रतिके यांचा सन्मान करणे हा मूलभूत कर्तव्याचा भाग म्हणून नमूद केले आहे. याच संवैधानिक कर्तव्याचा भाग म्हणून आणि राष्ट्रीय पुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांच्या सन्मानासाठी टेंभूर्णी येथे येत्या २८ जून रोजी सकाळी ११ वाजता टेंभूर्णी भिमानगर, पुणे-सोलापूर हायवे येथे रास्ता रोको केला जाणार आहे. देशाची एकता आणि एकात्मता यांना जोडणारे काही राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा महाराष्ट्रात सतत चालू असलेला अपमान पुण्यातील हडपसर येथील घटनेने अधोरेखित केला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. हे सांस्कृतिक राजधानी असलेले शहर देखील काही असुसंस्कृत घटनांना आणि घटकांना अपवाद नाही. देशाची एकता आणि एकात्मता यांना जोडणारे काही राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा महाराष्ट्रात सतत चालू असणारा अपमान पुण्यातील हडपसर येथील घटनेने अधोरेखित केला आहे. सामाजिक बंधुतेला काळीमा फासणारी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक करणारी घटना’ ही राष्ट्राचा व हिंदूंचा अपमान करणारी घटना आहे. ही घटना एक भारतीय म्हणून आणि हिंदू समाज म्हणून सहन होणे शक्य नाही. हिंदूंची अस्मिता असणारे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट आहे.
सतत एक ठराविक समाज ठरवून, कट रचून, पूर्वतयारीने फक्त हिंदू प्रतिकांचा आणि राष्ट्रपुरुषांचा व राष्ट्रप्रतिकांचा अपमान पुण्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारने ‘राष्ट्रपुरुष व राष्ट्रप्रतिके यांचा अपमान करून सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणारा गुन्हेगारांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देणारा’ कायदा पारित करावा. पुण्यात घडलेल्या घटनेला केंद्रस्थानी ठेवून अशा राज्यभरातील घटनांच्या निषेधार्थ हा रास्ता रोकोचा मोर्चा सकाळी ११ वाजता टेंभूर्णी येथे काढण्यात येणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.