टेंभूर्णी येथे पै. सिकंदर शेख आणि पै. सोनू कुमार यांच्या लढत होणार…

माढा विधानसभेचे भावी आमदार रणजीतभैय्या शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन
टेंभूर्णी (बारामती झटका)
टेंभुर्णी येथे माढा विधानसभेचे भावी आमदार रणजीत भैया शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन बंडू नाना ढवळे चेअरमन खरेदी विक्री संघ माढा तालुका, पै. नागनाथभाऊ खटके पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत तांबवे, पै. सोमनाथआप्पा महाडिक उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ, विजयदादा खटके पाटील अध्यक्ष शिवविचार प्रतिष्ठान टेंभुर्णी यांच्यावतीने शनिवार दि. २/३/२०२४ रोजी दुपारी ३ वा. राजमाता जिजाऊ चौक, बायपास ब्रिज, टेंभुर्णी-कुर्डूवाडी रोड येथे करण्यात आले आहे.
सदर कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे उद्घाटन ना. धनंजय मुंडे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यतत्पर पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे असणार आहेत. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बबनदादा शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार समाधानदादा अवताडे, आमदार राजनमालक पाटील, आमदार यशवंत माने, आमदार प्रशांतमालक परिचारक, आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, माजी आमदार जयवंतराव जगताप, कल्याणराव काळे, सुभाष गुळवे, अजित पाटील डी. वाय. एस. पी. करमाळा, दीपक पाटील पी. आय. टेंभुर्णी आदी मान्यवर उपस्थित असणार आहे.

या मैदानामध्ये इनाम रु. २,५५,५५५ रुपयांसाठी गंगावेस तालीम विश्वास हरगुले कोल्हापूर यांचा पठ्ठा पैलवान सिकंदर शेख विरुद्ध हरियाणा केसरी पैलवान सोनू कुमार यांच्यात लढत होणार आहे. तसेच हनुमान आखाडा पुणे पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे पैलवान गणेश जगताप यांच्यात लढत होणार आहे. यासह अनेक कुस्त्या या मैदानात होणार आहे. सदर मैदानाचे समालोचन पैलवान धनाजी मदने सर हे करणार आहेत. तरी कुस्तीशौकीन, वस्ताद, मल्लसम्राट यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.