ठरल्याप्रमाणे भांब गावच्या सरपंच पदाची निवडणूक होणार – प्रभारी सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रफुल्ल काळे.

भांब (बारामती झटका)
भांब गावचे विद्यमान सरपंच पोपटराव दगडू सरगर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे. या रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक दि. २४/१०/२०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, भांब येथे होणार आहे. सदरची निवड ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे प्रभारी सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रफुल्ल पांडुरंग काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
भांब ग्रामपंचायतीमध्ये बाळाबाई धुळा पांढरे, बकुबाई राजेंद्र काळे, प्रफुल्ल पांडुरंग काळे, पोपट दगडू सरगर, संगीता बाळू काळे, कमल प्रकाश सिद, सोपान गणपत काळे, कल्पना जगन्नाथ काळे, किरण सुरेश कांबळे अशी नऊ सदस्य आहेत. ठरल्याप्रमाणे सरपंच पदाची निवडणूक पार पडणार आहे. गुरुवार दि. २४/१०/२०२४ रोजी सकाळी ११ ते १२ वा. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळी १२ ते दु. १ पर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. दुपारी १ ते २ उमेदवारी मागे घेण्याची वेळ आहे. तर दु. २ वाजता सरपंच पदाची निवडणूक होणार आहे.
यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.