अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा प्रदीप गारटकरांची निवड.

पुणे (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुफळी नंतर तत्कालीन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बडतर्फीची कारवाई केली होती. याच सोबत गारटकर यांचे सदस्यत्वही रद्द केले होते. पक्षाच्या विरोधात भूमिका घेत अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा उपमुख्यमंत्री अजितदाद पवार यांच्याकडून प्रदीप गारटकर यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवार असे दोन गट निर्माण झाले असून अजित पवार यांसह इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना तर काहींनी शरदचंद्रजी पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना पाठिंबा दर्शवल्याचे आमदार दत्तात्रय भरणे आणि प्रदीप गारटकर यांनी बैठकीत जाहीर केले. यानंतर गारटकर यांच्यावर शरदचंद्रजी पवार गटाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng