तोंडले येथे १० वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

तोंडले (बारामती झटका)
तोंडले, ता. माळशिरस येथे हनुमान विद्यामंदिर प्रशाला तोंडले या शाळेतील इयत्ता दहावीच्या सन १९९२-९३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान विद्यामंदिर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एम. आर. मगर हे होते. तर यावेळी जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव चे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार सर व शाळा समिती हनुमान विद्यामंदिर चे सभापती हनुमंतराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत श्री. बिडवे सर, श्री. पलसे सर, श्री. देशमुख सर, श्री. बागल सर, श्री. ननवरे सर, श्री. आसबे सर, शिपाई खडके आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली तर, वंदे मातरम् या गीताने समारोप करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक एम. आर. मगर सर यांनी आपल्या भाषणात निर्भीडपणे जगण्याचा सल्ला दिला. तर, जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव चे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार सर यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उपस्थित शिक्षकांनीही शाळेतील अनुभव सांगितले. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख सांगून अनुभव सांगितले.
सन १९९२-९३ बॅच च्या वतीने पाच ते दहा मुलामुलींना सस्नेह भोजन देण्यात आले. तसेच सर्व गुरुजनांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. तर माजी विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यीनींनसाठी मनोरंजनाचे खेळ आयोजित करण्यात आले होते. माजी विद्यार्थी कु. छगन मारुती पोरे या दुबई येथून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ कोडग यांनी केले तर आभार प्रमोद जगताप यांनी मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



