ताज्या बातम्यासामाजिक

टीव्हीएस मोटरसायकल व सोलीस यनमार ट्रॅक्टर शोरूमच्या भव्य उद्घाटन समारंभाचे माळशिरस येथे आयोजन.

श्री दत्त प्रसन्न प्रा. लि. राचकर परिवार यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उत्साहात व थाटात शुभारंभ होणार…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथे श्री दत्त प्रसन्न प्रायव्हेट लिमिटेड यांच्या टीव्हीएस मोटरसायकल आणि सोलीस यनमार ट्रॅक्टरचा भव्य उद्घाटन समारंभ सोमवार दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 05 वाजता पुणे-पंढरपूर रोड, एसपी पेट्रोल पंपाशेजारी, माळशिरस येथे माढा लोकसभेचे खासदार श्री. धैर्यशील मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार श्री. गोपीचंद शेठ पडळकर, करमाळा विधानसभेचे माजी आमदार श्री. नारायण आबा पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार श्री. रामहरी रुपनवर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. उत्तमराव जानकर, महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

सदरच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत इन्कम टॅक्स कमिशनर पुणे श्री. डॉ. नितीन वाघमोडे, जीएसटी ज्वाईंट कमिशनर पुणे श्री. डॉ. राजेंद्र कुऱ्हाडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज श्री. अमरसिंह गवारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती श्री. राजेंद्र केसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, माळशिरस नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. डॉ. कल्याण हुलगे, आरटीओ इन्स्पेक्टर अकलूज श्री. संभाजी गावडे, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, तालुका कृषी अधिकारी माळशिरस श्री. आबासाहेब रुपनवर, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य श्री. डॉ. तानाजी जाधव व श्री. पृथ्वीराज उर्फ भैय्या बंडगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तरी मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक यांनी श्री दत्त प्रसन्न प्रायव्हेट लिमिटेड नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उत्साहात व थाटात शुभारंभ करीत आहोत, यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे समस्त राचकर परिवार यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button