उद्योग व्यवसायात परदेश गमन करणारे समाजकारण व राजकारणात यशस्वी असणारे आदर्श सरपंच रितेशदादा पालवे पाटील…
मांडवे गावचे बिनविरोध कर्तव्यदक्ष सरपंच रितेशदादा पालवे-पाटील यांची सलग तिसऱ्यांदा परदेश दौऱ्यावर जगप्रसिध्द जाॅयवीले शापुरजी पालोनजी समुहाकडून निवड…
माळशिरस (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस, या गावचे थोर सुपुत्र रितेशदादा बबनराव पालवे पाटील यांनी उद्योग व्यवसायात सोळा वर्ष रियल इस्टेट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे. रियल इस्टेट क्षेत्रातील अनुभव व त्यांची जिद्द, चिकाटी, सचोटी आणि प्रामाणिकपणा जपत सलग तिसऱ्यांदा परदेश दौऱ्यावर जगप्रसिद्ध जाॅयवीले शापुरजी पालोनजी समूहाकडून निवड झालेली आहे.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मांडवे गावचे सरपंच बबनबापू पालवे पाटील यांचा आदर्श, वसा व वारसा रितेशदादा जपत आहेत. पहिल्यापासून पालवे पाटील परिवार समाजकारण व राजकारण करून शेती व्यवसाय उत्कृष्ट रीतीने करीत आहेत. उद्योग व्यवसायामध्ये रितेशदादा यांनी रियल इस्टेटच्या माध्यमातून पालवे पाटील परिवाराचे नाव उद्योग क्षेत्रात केलेले आहे. सलग तिसऱ्यांदा परदेश दौऱ्यावर जाण्याचा बहुमान ग्रामीण भागातील युवा उद्योजकाला मिळालेला आहे.
उद्योग व्यवसायाबरोबर जनतेची, समाजाची सेवा करण्याकरिता राजकारणाची जोड असावी लागते. ते ग्रामपंचायत सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. सुशिक्षित सरपंच गावचा कारभार आदर्शवत कशा पद्धतीने चालवायचा असतो, याचा माळशिरस तालुक्यातील सरपंचांनी आदर्श घ्यावा, अशा पद्धतीने आदर्श सरपंच म्हणून रितेशदादा यांची राजकारणामध्ये नव्याने ओळख झालेली आहे.
बिनविरोध सरपंच पदाची धुरा खांद्यावर घेऊन वडील बबनबापू पालवे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची अविरतपणे सेवा करण्याचे काम सुरू आहे. सरपंच पदामध्ये किती ताकद आहे, याची जाणीव मांडवे गावच्या गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला आलेली आहे. अनेकांना व्यक्तिगत व सार्वजनिक अडचणीतून मार्ग काढून आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे.
भविष्यामध्ये गावचा जसा आदर्श कारभार करून नावलौकिक केला, तसाच परिसराचा विकास करण्याची संधी मिळावी, अशी रितेशदादा पालवे मित्रपरिवारांची अपेक्षा आहे. निश्चितपणे उद्योग व्यवसाय उत्कृष्टपणे सांभाळून समाजकारण व राजकारण करणारे आदर्श सरपंच रितेशदादा पालवे पाटील यांना वाढदिवसानिमित्त बारामती झटका परिवार यांचेकडून खूप खूप शुभेच्छा. रितेशदादा आपणांस उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो याच श्रीनिवास कदम पाटील परिवार यांचेकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.