उद्योगमहर्षी उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

अकलूज (बारामती झटका)
शिवरत्न उद्योग समूह, शिवशंकर बझार अकलूज, श्री क्षेत्र आनंदीगणेश सेवाभावी संस्था आनंदनगर अकलूजचे संस्थापक उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. २४/०९/२०२४ रोजी शक्ती स्थल, आनंदनगर, अकलूज ता. माळशिरस येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे –
१) श्री क्षेत्र आनंदीगणेश, आनंदनगर येथील शक्ती स्थल येथे उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या समाधीस अभिवादन मंगळवार दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वा. करण्यात येणार आहे.
२) आनंदनगर परिसरातील गरजू विद्यार्थीनींना सायकल वाटप कार्यक्रम सकाळी ९.३० वा. स्थळ – शक्तिस्थल आनंदनगर
३) वृक्षारोपण कार्यक्रम सकाळी ९.४५ वा. स्थळ – शक्तिस्थल आनंदनगर.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.