अंकोली (बारामती झटका)
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या जन्माष्टमी सोहळ्यानिमीत्त रविवार दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजीपासुन अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निमीत्ताने विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या काळात दररोज सायंकाळी ६.३० वाजता प्रवचन, रात्री ९ वा. किर्तन व हरीजागर होणार आहे. तर दररोज एका अन्नदात्याकडुन उपस्थितांना अन्नदान केले जाणार आहे. शनिवारी दि. २७ नोव्हेंबरला सकाळी १० वा. भैरवनाथ जन्माचे किर्तन, दुपारी १२ वा. फुले टाकण्याचा कार्यक्रम तर दुपारी २ वा. काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविकभक्तांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng