वेळापूर ( बारामती झटका )
सौ. पुष्पा नागेश काशीद अंगणवाडी सेविका पिसेवाडी, रा. भाकरेवाडी यांचे चिरंजीव डॉ. तुषार नागेश काशीद यांनी पुणे येथे बीएएमएस मध्ये घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाल्याबद्दल अर्धनारी नटेश्वर यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष पिसेवाडी वेळापूरचे युवा उद्योजक उमेशशेठ भाकरे यांनी सत्काराचे आयोजन केले होते.
डॉ. तुषार काशीद यांचा सन्मान वेळापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह सूर्यकांत माने देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी युवा उद्योजक उमेशशेठ भाकरे, पिसेवाडीचे उपसरपंच मोहन भाकरे, अंगणवाडी सेविका सौ. पुष्पा काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते. सौ. पुष्पा नागेश काशीद पिसेवाडी येथील अंगणवाडी शाळेत सेविका म्हणून कार्यरत आहे. त्यांना विशाल आणि तुषार दोन मुले आहेत. पती असून नसल्यासारखे आहेत. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी अफाट कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलेले आहे. विशाल यांनी बीबीए पूर्ण करून सध्या ते पुणे येथे नोकरी करीत आहे.

डॉ. तुषार यांनी पुणे येथे बीएएमएस मध्ये घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झालेले आहेत. डॉ. तुषार यांचा पुढे एमडी करण्याचा मानस आहे. विशाल आणि तुषार यांनी प्रतिकूल परिस्थितीत वडिलांचा आधार नसताना आईने केलेले कष्ट डोळ्यासमोर ठेवून आपले उच्च शिक्षण पूर्ण केलेले आहे. सौ. पुष्पा काशीद यांनी पितृत्व आणि मातृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. खडतर प्रवास करत त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठेही कमतरता येऊ दिली नाही. सौ. पुष्पा यांना त्यांचे बंधू युवा उद्योजक उमेशशेठ भाकरे यांनी वेळोवेळी अडचणीत मदत केलेली आहे. विशाल आणि डॉ. तुषार यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आईने केलेल्या कष्टाचे चीज केलेले असल्याने डॉ. तुषार यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng