वाघोली (बारामती झटका)
तांदुळवाडी ता माळशिरस येथील वारकरी संप्रदायाचे ह भ प हनुमंत रंगनाथ मिले यांचे वयाच्या ९० व्या वर्षी दि २८डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आज दि ३०रोजी तिसरा दिवस म्हणजे सावडने (रक्षा विसर्जन)होता.या दिवशी कै हनुमंत मिले यांच्या रक्षा विसर्जनाचा विधी अंधश्रद्धेला फाटा देऊन रक्षा नदीच्या पाण्यात विसर्जित न करता त्याच्याच शेतात खड्डे घेऊन वेग वेगळ्या प्रकारच्या वृक्षांरोपण करून त्या वृक्षा च्या खड्यात रक्षा विसर्जित करण्यात आल्या.
वृक्षारोपण पंढरपूर येथील वासकर फडाचे प्रमुख राणू महाराज वासकर,कुटुंबातील भाऊ अजिनाथ मिले,सज्जन मिले,मुलगा,नवनाथ मिले,बिभीषण मिले,मुलगी सौ अक्काताई माने ,डॉ अमोल माने ,पत्नी सर्व सदस्य,मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने,रामचंद्र मिसाळ,भागवत मिले यांचे हस्ते केले
सदर वेळी कै हनुमंत मिले यांना श्रद्धांजली वाहताना ऍड नागेश काकडे,वसंत सुरवसे सर,डॉ अमोल माने यांनी हनुमंत मिले यांच्या राजकीय,सामाजिक, वारकरी चळवळीतील आठवणी सांगून श्रद्धांजली वाहिली.
शेवटी वासकर फडाचे मालक राणू महाराज वासकर यांनी कै हनुमंत मिले उर्फ भाऊ यांच्या जाण्याचे दुःख मिले कुटुंबाला झाले नसून समस्त वासकर फड पंढरपूर यांनाही झाले असलेचे सांगून कै भाऊ यांची पोकळी वासकर फडालाही जाणवणार आहे. कै हनुमंत मिले यांनी संपूर्ण आयुष्य सांप्रदायिक कार्यात वाहून घेऊन सेवा केली. त्यांनी ज्या निष्ठेने वारकरी संप्रदायात सेवा केली त्या प्रमाणे त्यांच्या वारसांनी सुद्धा कै भाऊंप्रमाणे सांप्रदायिक कार्य करावे अशी अपेक्षा ह भ प राणू महाराज वासकर यांनी व्यक्त केली
मराठा सेवा संघाचे विचार धारेनुसार कै हनुमंत मिले यांचे उर्वरित विधी हे पाचव्या दिवशीच करणार असल्याचे त्यांचे कुटुंबीयांनी सांगितले .सदर उपस्थित राजकीय,सामाजिक,नातेवाईक,ग्रामस्थांनी मिले कुटुंबाचे सांत्वन करून राबविलेल्या उपकर्माबद्धल कौतुक केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng