अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील रसायन शास्ञ विभागातील प्राध्यापिका दमयंती रामचंद्र कांबळे यांना “स्टडीज ऑन रेअर अर्थ मेटल आयन्स डोप्ड व्हॅनॅडेटस फाॅर गॅस सेन्सींग अॅप्लीकेशन्स” या विषयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचेकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. त्यांना माजी प्राचार्य डाॅ. एस. आर. बामणे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिक स्वरुपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दत्ताञय बागडे व रसायन विभाग प्रमुख डाॅ. सतिश देवकर व इतर सहकार्यांनी प्रा.डाॅ.दमयंती कांबळे यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्ञ विभाग प्रमुख डाॅ. के. डी. सोनवणे, डाॅ. के. एम. गरडकर, डाॅ. जी. बी. कोळेकर व डाॅ. एस. एस. कोळेकर यांचे प्रोत्साहन मिळाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng