अकलूज (बारामती झटका)
रोटरी क्लब अकलूज, ता. माळशिरस येथे अकलूज स्त्री आरोग्य संघटना अकलूज, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, दोशी मायक्रोबॉयलॉजी अँड पॅथ लॅब अकलूज, इंनरव्हील क्लब ऑफ अकलूज, रोटरी क्लब ऑफ सराटी डीलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत स्त्री आरोग्य तपासणी शिबीर गुरुवार दिनांक 17/03/2022 रोजी सकाळी 09 ते दुपारी 01 वा. पर्यंत उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिरातस्तन कर्करोग तपासणी, गर्भाशयमुख कर्करोग तपासणी, कोलपोस्कोपी व पॅप तपासणी आदी तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ 35 वर्षापुढील स्त्रियांना घेता येणार आहे.
रो. सीए. नितीन कुदळे अध्यक्ष रोटरी क्लब अकलूज मो. ९७६३३४४७९९, डॉ. मदन कांबळे अध्यक्ष अकलूज स्त्री आरोग्य संघटना, डॉ. बाहुबली दोशी दोशी पॅथ लॅब मो. ९६७३९९७७७९, रो. सोनाली सोनाज अध्यक्ष रोटरी क्लब सराटी डीलाईट मो. ९९७०२५२०२०, मेघा जामदार अध्यक्ष इनरव्हील क्लब अकलूज मो. ७०३०३८०८०८ या नंबरवर नाव नोंदणी करावी. सदर शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng