अकलूजमध्ये दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सिग्नल पुन्हा पूर्ववत

सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सिग्नलचा वाहनधारक व नागरिकांना फायदा

अकलूज ( बारामती झटका )

आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी अकलुज ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झालेले आहे. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर अकलूज येथील सिग्नल पूर्ववत करण्यात आलेले आहे. तत्कालीन सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सिग्नलचा वाहनधारक व नागरिकांना फायदा होत आहे.
अकलूज येथील बाजारपेठ, दर्जेदार शिक्षण व अन्य कामानिमित्त आसपासच्या गावातील वाहन धारक नागरिकांची नेहमी वर्दळ सुरू असते‌.

अकलुजमधील सदभाऊ चौक, गांधी चौक अशा महत्त्वाच्या चौकांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका श्रीमती स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वात युवा नेते उद्योजक किर्तीध्वजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शहरांमध्ये सिग्नल सुरू केले होते. घाईगडबडीत असलेल्या माणसांचे अपघात होत होते‌ त्यामुळे जीवित व वित्त हानी होत होती. ही बाब सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी ओळखून सिग्नलची होय अकलूजमध्ये केलेले होती. अकलुजमधील सिग्नल दीपावलीच्या सणानिमित्त खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना खरेदीदारांना वाहनांची शिस्त लागावी, यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय जाधव, अकलूजचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, अकलूज पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या प्रयत्नाने सिग्नल पूर्ववत सुरू केलेले असल्याने नागरिकांना वाहनधारकांकडून त्रास कमी झालेला आहे. वाहनधारकही सिग्नलचा योग्यप्रकारे वापर करून अकलुजमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू असल्याने वाहनधारक व नागरिक यांच्यामधून समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा धुमधडाका.
Next articleमाजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here