अकलूजच्या वैभवात भर घालणारी माने पाटील परिवार यांच्या संकल्पनेतून साकारलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री युक्त पुणे, मुंबई शहरासारखी.
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज ता. माळशिरस येथील श्री गजानन महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स (आधार) अकलूज टेंभुर्णी रोड, गांधी चौक या ठिकाणी स्थलांतरित राईज टू फिटनेस “RISE TO FITNESS” या आधुनिक युक्त सुख सुविधा यंत्र सामग्री असणाऱ्या भव्य जिमचा स्थलांतरित सोहळा गुरुवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी भव्य थाटामाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला.


अकलूजच्या वैभवात भर घालणारी धर्मवीर सदाशिवराव माने पाटील उर्फ सदुभाऊ यांचे नातू उद्योजक सुजयसिंह माने पाटील व कल्पक बुद्धिचातुर्य असणारे अजिंक्य माने पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली अत्याधुनिक यंत्र सामग्रीने साकारलेली सुसज्ज अशी सुख सोईने परिपूर्ण अशी पुणे-मुंबईसारख्या धरतीवर ग्रामीण भागातील पहिली अद्यावत जिमचा शुभारंभ सदाशिवराव माने विद्यालयाचे माजी सभापती ज्येष्ठ नेते हिंदुराव माने पाटील व सौभाग्यवती नीलिमा माने पाटील या उभयतांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करून संपन्न झालेला आहे.

सुजयसिंह आणि अजिंक्य माने पाटील राम-लक्ष्मण सारख्या बंधूंनी पाच वर्षांपूर्वी राईज टू फिटनेस या जिमचा शुभारंभ अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील जागेत सुरू केलेले होती. अत्याधुनिक मशिनरी सुख-सुविधा आणि परिपूर्ण असणारे प्रशिक्षक यामुळे सदर जिमला युवक व युवतींनी सहभाग नोंदविला होता.

सदरच्या ठिकाणी दिवसेंदिवस जागेची अडचण भासू लागली यामुळे नवीन स्वतःच्या जागेत स्थलांतरित केलेली आहे. सध्या अद्यावत व सुख-सुविधाने सुसज्ज करण्याकरता 3800 स्क्वेअर फूट जागा अद्यावत एयर कंडीशन आहे. सदरच्या जिममध्ये अनेक अद्यावत मशनरी उभारण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी खास वॉशरूम व चेंजिंग रूम तयार केलेली आहे महिलांसाठी स्वतंत्र बॅच सुरू करणार आहेत.

स्थलांतरित जिमला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. जिमची रचना, अद्यावत मशिनरी सजावट, प्रशस्त जागा, पाहून अनेकांना आपण पुणे-मुंबई येथे आहोत याचा भास होत होता. शुभारंभास आलेल्या सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व जिमप्रेमी यांचे स्वागत माने पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात येत होते. राईज टू फिटनेस या अद्यावत जिमला संपर्क साधण्यासाठी 92 84 61 23 92 दत्ता सर यांच्याशी संपर्क साधावा.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
