अकलूज (बारामती झटका)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि. २२/०४/२०२२ रोजी स. ९ ते दु. २ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे करण्यात आलेले आहे. या मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांना सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. यामध्ये हृदय रोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री तपासणी, लहान मुलांचे आजार, किडनी आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कान, नाक, घसा आजार, अस्थीरोग, एच आय व्ही तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग इत्यादी सर्व आजारांवर विशेषज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी केली जाणार आहे. रक्त, लघवी, एक्स-रे व ईसीजी यांच्या तपासण्या देखील मोफत केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जाणार आहेत. आयुर्वेद विभागाअंतर्गत मोफत तपासणी तसेच निरोगी जीवनशैली विषयी आहार, योगा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे किशोर वयातील मुलामुलींना, कुमार अवस्थेतील बालकांच्या समस्या याविषयी सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या भव्य मोफत आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदान शिबिर तसेच नेत्रदान, अवयव दान, देहदान, यासंबंधी स्वयम् इच्छापत्र भरून घेतले जाणार आहे. या आरोग्य मेळाव्यासाठी आय. एम. ए. अकलूज, केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन अकलूज, रोटरी क्लब अकलूज, इनरव्हील क्लब अकलूज, रोटरी क्लब सराटी डीलाईट, सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल, सोलापूर, विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज, अकलूज यांचे सहकार्य असणार आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अकलूज क्रिटिकल केअर व ट्रॉमा सेंटर, अकलूज, सूर्यवंशी ट्रॉमा व रिहॅबिलिटेशन सेंटर अकलूज, मेडिकल सेंटर अकलूज, कदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अकलूज या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत.
तरी या मोफत आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng