अकलूज उपजिल्हा रूग्णालयाचे नवीन वैद्यकीय अधिक्षक डाॅ. महेश गुडे यांचा सत्कार.

संग्रामनगर (बारामती झटका)

अकलूज येथील उपजिल्हा रूग्णालयात नव्याने रूजू झालेले वैद्यकीय अधिक्षक डाॅ. महेश गुडे यांचा सत्कार विविध अपंग संघटनेच्यावतीने फेटा, हार व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. गेली वीस वर्ष हे वैद्यकीय अधिक्षक पद रिक्त होते.
आज कार्यालयात डाॅ. महेश गुडे आल्यानंतर श्री. विजयसिंह मोहिते पाटील बहुउद्देशीय सेवा भावी अपंग संघटना, प्रहार दिव्यांग अपंग क्रांती संघटना, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेल व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. निखिल मिसाळ, शहाजीराव माने देशमुख, गोरख जानकर, सुभाष गोसावी, अशोक कोळेकर, राजू पवार, अभिमान म्हेत्रे, मंगल टेके, नारायण येडगे, मोहन चमरे, श्री. काळे व तालुक्यातील संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या सत्काराला उत्तर देताना डाॅ. गुडे म्हणाले की, रूग्णांची सेवा ही ईश्वर सेवा समजून उपजिल्हा रूग्णालयात येणा-या सर्व रूग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी मी व माझे सहकारी कटीबध्द आहेत. तसेच अपंगांसाठी कमीत कमी वेळेत जास्त सेवा पुरवण्यात येईल. यावेळी अपंग व्यक्तींची तपासणी करणारे डाॅ. निखिल मिसाळ यांचाही संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात एकच एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत, बाबासाहेब माने पाटील मित्र परिवाराच्यावतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
Next articleसामाजिक कार्यकर्ते युवा नेते ऋषिकेश बनसोडे यांचा शालेय विद्यार्थिनींसाठी स्तुत्य उपक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here