अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 81 उमेदवारी अर्ज दाखल…

मदनसिंह मोहिते पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, उत्तमराव जानकर, के. के. पाटील, मामासाहेब पांढरे, मालोजीराजे देशमुख यांच्यासह अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल.

अकलूज (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. 18 जागांसाठी 81 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामध्ये सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या उमेदवारांनी दोन दोन अर्ज भरलेले आहेत.

निवडणुकीमध्ये सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण 7 जागेसाठी मोहिते पाटील मदनसिंह शंकरराव यशवंतनगर, रुपनवर मारुतीराव नाथा डोंबाळवाडी कुरबावी, चव्हाण शिवाजी चंद्रकांत चंद्रपुरी तांबेवाडी, सावंत नितीन अशोक कोळेगाव, देशमुख शहाजीराव मुधोजीराव नातेपुते, कदम बाबुराव शंकरराव झंजेवस्ती, माने देशमुख बाळासो गुलाबराव शेरी वेळापूर, गायकवाड रामचंद्र गजाबा बागेचीवाडी, देशमुख मालोजीराजे शहाजीराव नातेपुते, कदम पाटील श्रीनिवास शिवाजीराव मळोली, मोहिते पाटील पद्मजादेवी प्रतापसिंह धवलनगर यशवंतनगर, काकडे नागेश रघुनाथ तांदुळवाडी, देशमुख रणजीतसिंह हंसाजीराव अकलूज, जानकर उत्तमराव शिवदास वेळापूर, सावंत बाळासाहेब बंकट दसुर, वाघमोडे मधुकर भानुदास फोंडशिरस, सावंत राहुल अरुण दहिगाव, इंगळे गणेश भजनदास इंगळेवस्ती संगम, पिसे पांडुरंग किसन गोरडवाडी, वाघमोडे पांडुरंग तुळशीराम 61 फाटा माळशिरस, बोरकर अजित भरत विझोरी, वाळेकर राजेंद्र वसंत महाळुंग, लाटे दादासाहेब अरुण पायरीपुल महाळुंग, पाटील शरद ज्ञानेश्वर महाळुंग, पवार लक्ष्मण अगतराव इस्लामपूर.

सहकारी संस्था मतदार संघ महिला राखीव दोन जागेसाठी साळुंखे मेघा सचिन तांबेवाडी, सुरवसे अमृता सुधीर खळवे, खराडे रोहिणी जीवन यशवंतनगर, मोहिते पाटील पद्मजादेवी प्रतापसिंह धवलनगर यशवंतनगर, कागदे शोभा तानाजी दसुर, पाटील सोनाली राजेंद्र फोंडशिरस.

सहकारी संस्था मतदार संघ इतर मागासवर्गीय एक जागेसाठी राऊत भानुदास यशवंत नातेपुते, पिसे दत्तात्रेय काशिनाथ यशवंतनगर, फुले भीमराव सदाशिव दहिगाव, बरडकर उत्तम गलबु नातेपुते, बोराटे पोपट बाबा फोंडशिरस.

सहकारी संस्था मतदार संघ विमुक्त जाती विमुक्त जमाती एका जागेसाठी पाटील संदीप शामदत्त साठ फाटा माळशिरस, पाटील विश्वजीत सूर्यकांत साठ फाटा माळशिरस, ओरसे अंबादास सायबु लोणार गल्ली अकलूज, बोरकर अजित भरत विझोरी.

ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण दोन जागेसाठी पांढरे बापूराव नारायण नातेपुते, पवार लक्ष्मण आगतराव इस्लामपूर, घाडगे विष्णू सदाशिव कोंडबावी, कदम पाटील श्रीनिवास शिवाजीराव मळोली, मोहिते पाटील पद्मजादेवी प्रतापसिंह धवलनगर यशवंतनगर, पाटील केशवराव कृष्णराव उर्फ के. के. पाटील निमगाव, जगदाळे तानाजी चंद्रकांत उघडेवाडी, देशमुख शहाजीराव मुधोजीराव नातेपुते.

ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी लोखंडे दत्तूराम हरिदास सुळेवाडी, डावरे रामचंद्र अनंता यशवंतनगर, जानकर उत्तमराव शिवदास वेळापूर, सरतापे मिलिंद वाल्मीक वेळापूर.

ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एका जागेसाठी भोसले पोपट रंगनाथ उंबरे वेळापूर, घाडगे यशवंतराव बाळासाहेब वेळापूर, गोडसे रामचंद्र दामोदर यशवंतनगर, सावंत राहुल अरुण दहिगाव.

व्यापारी मतदार संघ दोन जागेसाठी फडे आनंदा अशोक संग्रामनगर, गांधी महावीर मगनलाल नातेपुते, बागवान मोहसीन समशुद्दीन अकलूज, गरड दीपक महादेव अकलूज.

हमाल व तोलार मतदार संघात एका जागेसाठी डांगरे उद्धव निवृत्ती आनंदनगर, भोसले रवींद्र संदिपान खंडाळी दत्तनगर, कोळेकर संजय जीवराज अकलूज असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत.

सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एल. शिंदे काम पाहत आहेत. बुधवार दि. 05/04/2023 रोजी छाननी होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे संवेदनशील व्यक्तिमत्व – श्री श्री रविशंकर गुरुजी
Next articleअकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून उमेदवारांची आदलाबदल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here