Home इतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिपाई गणेश नामदास यांची गळफास घेऊन आत्महत्या.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिपाई गणेश नामदास यांची गळफास घेऊन आत्महत्या.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ व सचिव राजेंद्र काकडे यांचा मयत गणेश नामदास यांच्या चिट्टीत उल्लेख…

नातेपुते ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समिती नातेपुते, ता. माळशिरस येथे मंगळवार दि. 24 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजण्याचे दरम्यान शिपाई आणि रखवालदार गणेश अंगत नामदास (वय 46, रा. एकशिव) यांनी दोरीने गळफास घेऊन दुय्यम कृषी उत्पन्न कार्यालय, नातेपुते कार्यालयात सभागृहातील पंख्याला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलेली आहे.

मयत गणेश अंगत नामदास यांनी खिशामध्ये आत्महत्या करण्यापूर्वी चिट्टी लिहून ठेवलेली होती. त्यामध्ये अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ व सचिव राजेंद्र काकडे यांचा नामोल्लेख असलेली चिट्टी खिशामध्ये सापडलेली असून सदरची चिठ्ठीचे वाचन नातेवाईक व उपस्थित लोकांमध्ये नातेपुते पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी केलेले होते.

मयत गणेश अंगत नामदास यांची कन्या वैभवी विक्रम गोरवे (रा. खुडूस) यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी अर्जावरून नातेपुते पोलीस स्टेशन येथे मयत नंबर 04 दि. 25 जानेवारी 2023 असा गुन्हा नोंद झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक ए. एम. भगत यांच्याकडे आहे. सदरच्या चिठ्ठीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, गेली अनेक वर्ष शिपाई आणि रखवालदार या पदावर कार्यरत आहे. प्रतिदिन 185 रुपये पगारावर आजपर्यंत काम करीत आहे. माझी पत्नी आजारी असते, कमी पैशात नोकरी केलेली असल्याने घरप्रपंच चालवणे अवघड होत आहे. वारंवार सर्व संचालक मंडळ व सचिव राजेंद्र काकडे यांना विनंती करून, सांगूनसुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष झालेले असल्याने मी जीवन संपवत असल्याचा उल्लेख चिट्टीमध्ये आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे मयत गणेश नामदास यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव राजेंद्र काकडे यांच्यावर तपासानंतर गुन्हा नोंद होतो की काय ? किंवा या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार का ? अशी शंका, कुशंका माळशिरस तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे. मयत गणेश नामदास यांचे शवविच्छेदन केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here