अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांची एकच फाइट सत्ताधारी गटाची पुंगी टाईट..

सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधकांच्या बैठकीवरून शिवरत्नवरील हालचाली वाढल्या, उमेदवार बदलण्याची शक्यता ?

अकलूज ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून सेवा सोसायटी मतदार संघ, ग्रामपंचायत मतदार संघात उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेली होती. सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधकांची बैठक संपन्न होऊन सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची कुणकुण लागताच शिवरत्नवरील हालचाली वाढलेल्या आहेत. निवडणूक बिनविरोध होणार, अशी खात्री असल्याने उमेदवार राजकीय समीकरण जुळवण्याच्या दृष्टीने दिलेले होते. मात्र, निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यावे लागतील यासाठी उमेदवार बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाकडून सेवा सोसायटी मतदारसंघ व ग्रामपंचायत मतदार संघात आरक्षण निहाय नामनिर्देशन पत्र दाखल केलेली होती. त्यामध्ये
सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यशवंतनगर, मारोतराव नाथा रुपनवर डोंबाळवाडी कुरबावी, शिवाजी चंद्रकांत चव्हाण चंद्रपुरी तांबेवाडी, नितीन अशोक सावंत कोळेगाव, शहाजीराव मुधोजीराव देशमुख नातेपुते, बाबुराव शंकरराव कदम झंजेवस्ती पिलीव, बाळासो गुलाबराव माने देशमुख शेरी वेळापूर, रामचंद्र गजाबा गायकवाड बागेचीवाडी, महिला राखीव मेघा सचिन साळुंखे तांबेवाडी, अमृता सुधीर सुरवसे खळवे, रोहिणी जीवन खराडे, भटक्या विमुक्त जाती जमाती संदीप शामदत्त पाटील ६० फाटा पाटील वस्ती माळशिरस, विश्वजीत सूर्यकांत पाटील ६० फाटा पाटीलवस्ती माळशिरस, इतर मागासवर्गीय भानुदास यशवंत राऊत नातेपुते, दत्तात्रेय काशिनाथ पिसे यशवंतनगर, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण बापूराव नारायण पांढरे नातेपुते, लक्ष्मण अगतराव पवार इस्लामपूर, विष्णू सदाशिव घाडगे कोंडबावी, अनुसूचित जाती जमाती दत्तूराम हरिदास लोखंडे सुळेवाडी, रामचंद्र अनंता डावरे यशवंतनगर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल पोपट रंगनाथ भोसले उंबरे वेळापूर अशी नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघात श्रीनिवास कदम पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज वगळता सत्ताधारी मोहिते पाटील गटाचे सोसायटी मतदार संघात 11 जागा व ग्रामपंचायत मतदार संघात 04 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधकांची बैठक वेगवेगळ्या ठिकाणी होऊन १८ सदस्यांची उमेदवारी यादी तयार झालेली आहे. विरोधी गटातील उमेदवारांची यादी समोर सत्ताधारी गटातील उमेदवारांचा निभाव लागेल की नाही, अशी शंका येत असल्याने नामनिर्देशन पत्र भरलेल्या कोणत्या उमेदवारांना डच्चू बसतोय ? का नाम निर्देशन पत्र भरलेले सर्वच उमेदवार राहतात ?, याकडे तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार दि. ०३/०४/२०२३ रोजी शेवटचा दिवस असल्याने खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे चित्र स्पष्ट होईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाढा लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय रस्ते निधी योजनेतून ५५ कोटी ८७ लाखांचा भरघोस निधी – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
Next articlePromoting Insights

1 COMMENT

  1. नाव बारामती झटका आणी लक्ष्य सोलापूर जिल्हा, कधीतरी बारामतीच्या बारा करामतीबद्द्ल लिहीत जावा, पैसे घेऊन पत्रकारिता करु नका, 2019 ची अमित शहांची सभा का होऊ दिली नाही याची पण बातमी लिहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here