अकलूज डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी श्रीपूर येथील मटका व्यवसायाचे केले स्टिंग ऑपरेशन.

अकलूज विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या पथकाने मटका चालक व मालक यांचा मटका बसवला.


श्रीपुर ( बारामती झटका )

श्रीपुर तालुका माळशिरस येथील अवैद्य मटका व्यवसाय करणारे प्रकाश शिवदास भोसले व लखन दत्तात्रय कारंडे या मटका घेणाऱ्या चालकांचे मालक रतन सिंह राजपूत व अल्लाबक्ष शेख राहणार सर्व श्रीपुर यांच्यावर अकलूज पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखालीश्रीपूर येथील मटका व्यवसायिक यांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे अकलूज विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या पथकाने मटका चालक व मालक यांचा मटका बसवला असल्याची चर्चा श्रीपुर परिसरात रंगलेली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार पानसरे पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड पोलीस नाईक शिंदे पोलिस कॉन्स्टेबल सूर्यवंशी असे अवैद्य व्यवसायावर छापा मारण्याकरता आलेले असता सत्यम हॉटेल च्या पाठीमागे प्रकाश शिवदास भोसले वय 32 वर्षे राहणार उजनी कॉलनी श्रीपुर तालुका माळशिरस यांच्याकडील 78 70रोख रक्कम अंक आकडेमोड केलेले लहान मटका घेणे करता वापरत असलेले दोन लहान पुस्तके पंचा समक्ष जप्त करून पकडलेल्या इसमानेमटका कोणास देतो असे विचारले असता त्याने सदरचा मटका रतन सिंह रजपूत राहणार श्रीपुर तालुका माळशिरस यांचे सांगण्यावरून घेत असून मटक्याच्या चिठ्ठ्या मालक स्वतः घेऊन जात असल्याचे सांगितले. तर लखन लोंढे चे पाठीमागे लखन दत्तात्रय कारंडे वय 24 वर्षे राहणार 9 चा गोटा श्रीपुर तालुका माळशिरस याच्याकडे 670 रोख रक्कम व अंक आकडेमोड केलेले लहान मटका घेण्यासाठी वापरलेले 3 पुस्तके , पंचायत समक्ष जप्त करूनसदर इसमाने मटका कोणास देतो असे विचारले असता सदर चा मटका अल्लाबक्ष शेख राहणार श्रीपुर यांचे सांगण्यावरून घेत असून मटक्याची चिठ्ठ्या मालक स्वतः घेऊन जात असल्याचे सांगितले वरील दोन्हीचालक व मालक यांचे विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ ) प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद दिलीप सूर्यवंशी यांनी अकलूज पोलीस ठाणे येथील पोलीस ठाणे अंमलदार यांच्याकडे कायदेशीर फिर्याद दिलेली आहे.
अकलूज उपविभागाचा पदभारउपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी घेतल्यानंतर प्रसार माध्यमांना माहिती देताना अवैद्य व्यवसायिक रडारवर असतील असे सांगितलेले होते त्याप्रमाणे त्यांनी मटका चालक व मालक यांच्यावर कारवाई केलेली असल्याने श्रीपुर परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे पोलिस प्रशासन कारवाई करून अवैद्य व्यावसायिकांच्या मुसक्या आवळत असल्याने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायत हद्दीतील भूसंपादनचा प्रश्न चिघळणार मावळची पुनरावृत्ती होणार का ?
Next articleपुणे विभागातील 19 लाख 53 हजार 43 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here