अकलुज नगर परिषदेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त पदी नियुक्ती.
अकलूज ( बारामती झटका )
अकलूज नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी दयानंद दादासाहेब गोरे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे तर, अकलूज नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी धैर्यशील जाधव यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त पदी बदली झालेली आहे.
दयानंद दादासाहेब गोरे रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मुख्याधिकारी गट-ब संवर्गातून मुख्य अधिकारी गट अ संवर्गात पदोन्नती व पदस्थापना ५३ अधिकाऱ्यांच्या शासनाचे अप्पर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी पदस्थापना केलेल्या आहेत. त्यामध्ये अकलूज नगरपरिषदेचे नव्याने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची नियुक्ती झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng