अकलूज नगरपरिषदेच्या 3 कोटी 45 लाख रूपयांच्या विकासकामांचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते भूमीपूजन

अकलूज ( बारामती झटका )

अकलूज नगरपरिषदेच्या वतीने परिसरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन आज आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व आ. राम सातपुते यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भाजपा संघटन महामंत्री धैर्यशिल मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, आजी माजी सदस्य व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

भूमीपूजन झालेल्या प्रमुख विकासकामाध्ये काळाची गरज ओळखून हिंदू स्मशानभूमी येथे तब्बल 1 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक गॅसदाहीनी उभारण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक, वेळेची व पैशाची बचत होणार्‍या या गॅस दाहिनीसाठी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याचे यावेळी माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

याबरोबरच 25 लाख रूपये खर्चून मुस्लिम समाज दफनभूमी येथे बांधण्यात येणार्‍या संरक्षण भिंतीचे, रामायण चौक व शिवाजी चौक येथे 60 लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्‍या महिला व पुरूष यांचेकरिता सार्वजनिक शौचालयाचे, विजयनगर कॉलनी येथे 30 लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्‍या महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे, महानुभव मठ येथे 20 लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्‍या महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे, महर्षी कॉलनी 21 खोल्या शाळा पाठीमागे 30 लाख रूपये खर्चन बांधण्यात येणार्‍या महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे, इंदिरानगर वसाहत क्रांतीसिंह घरकुल येथे 30 लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्‍या महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे, काझी गल्ली येथे 20 लाख रूपये खर्चून महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालयाचे तसेच नामदेव मंगल कार्यालयासमोर 30 लाख रूपये खर्चून महिला व पुरूष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालय बांधकामाचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचैतन्य जप प्रकल्पाच्या राज्यस्तरीय शिबिरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न
Next articleLaws That Provides Safeguards For Your Info

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here