अकलूज नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, एकत्र लढल्यास चमत्कार घडेल…


कसबा पोट निवडणुकीतील एकत्र ताकतीने बाले किल्ला उध्वस्त केला त्याचीच पुनरावृत्ती नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा गड उध्वस्त होईल…

अकलूज ( बारामती झटका )

आशिया खंडात सर्वात मोठी समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक लागणार आहे. अकलूज नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना एकत्र लढल्यास निवडणुकीत चमत्कार घडेल. पुणे कसबा पोट निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढलेले असल्याने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने अनेक वर्षाचा बालेकिल्ला उध्वस्त केलेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती अकलूज नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा गड उध्वस्त होईल, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.

अकलूज ग्रामपंचायत स्थापनेपासून एकाच गटाचे निर्विवाद वर्चस्व कायम आहे. गतवेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सौ. उर्वशीराजे मोहिते पाटील, गिरीराज माने पाटील, ज्योतीताई कुंभार यांनी सत्ताधारी गटाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलेला होता. थोड्याफार फरकाने अनेक सदस्य पराभूत झालेले होते. थोडीशी ताकद कमी पडलेली होती. त्यावेळेला मताची विभागणी झालेली होती.

नगरपरिषद झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. २७ नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रभाग, वार्ड रचना झालेली आहे. प्रभागांमध्ये ज्या नेत्याचे किंवा पक्षाचे प्राबल्य आहे, अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून नऊ नऊ जागा घेऊन सोबत येणाऱ्या अन्य पक्ष व संघटना यांना एक दोन प्रत्येकाने जागा सोडल्यास नगरपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. सध्या सत्ताधारी गट भाजपमध्ये आहे. पूर्वीचा भाजपमध्येही एक गट आहे. निवडणुकीत पूर्वीच्या भाजप बुद्रुक गटाला सत्ताधारी गट स्थान देणार नाही. त्यामुळे भाजप बुद्रुक यांचाही फायदा काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीला होणार आहे. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंगभाऊ देशमुख, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेवनाना वाघमारे, अशोकराव गायकवाड, दत्ता पवार, अण्णा कुलकर्णी, किरण साठे, नवनाथ साठे, स्वप्निल वाघमारे, साजिद सय्यद, गिरीश शेटे, रणजीतसिंह देशमुख, ॲड. वीरेंद्र वाघमारे यांच्यासह तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन निवडणुकीची रणनीती ठरली तर, अनेक रवींद्र धंगेकर अकलूज नगर परिषदेमध्ये जनतेची सेवा करताना पाहावयास मिळतील, यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य जनता व मतदार यांच्यामधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातून कु. प्रदीप गोरड चे यश तर वैद्यकीय क्षेत्रात डॉ. मच्छिंद्र गोरड यांना मास्टर ऑफ सर्जन ची पदवी.
Next articleजिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी पांडुरंग सुर्यवंशी तर सरचिटणीस पदी आनंद टेके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here