अकलूज पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह ? महिलांमधून पोलीस प्रशासनावर प्रचंड नाराजी.

पोलीस उप अधीक्षक बसवराज शिवपुजे यांनी लक्ष देण्याची गरज, अन्यथा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी लक्ष द्यावे.

अकलूज ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील अकलूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्री-अपरात्री चोरट्यांनी घरफोडी केलेली आहेत. अनेक ठिकाणच्या चोऱ्या करणाऱ्या चोरांचे पोलिसांना ठाव ठिकाण लागलेला नाही. त्यामुळे अकलूज पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. त्यामुळे महिलांमधून पोलीस प्रशासनावर प्रचंड नाराजीचा सूर निघत आहे.

माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलीस कार्यालय आहे. विशेष म्हणजे अकलूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अकलूज येथेच उपविभागीय कार्यालय आहे. पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांनी घरफोडी झालेल्या घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा सोलापूर ग्रामीणच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी लक्ष द्यावे, असे पीडित महिलांमधून बोलले जात आहे.

अकलूज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी घरफोड्या झालेल्या आहेत. पोलीस प्रशासनावरील ताण कमी व्हावा यासाठी बीट अंमलदार वेगवेगळ्या गावांसाठी नेमलेले आहेत. गुन्हेगारांचा व चोरांचा शोध घेण्याकरिता डिबी ब्राॅच स्वतंत्र आहे. पोलीस स्टेशन हद्दीत खबऱ्यांची सुद्धा संख्या मोठी आहे‌. मात्र घरफोड्या करणाऱ्या चोरांचा शोध लागत नाही.

विजयवाडी येथील उपचारासाठी बाहेरगावी गेलेल्या बंद घराची कंपाऊंडची जाळी कट करून खिडकीतील ग्रील तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील दीड ते दोन किलो चांदीची भांडी, रोख रक्कम, चिल्लर असा ऐवज लंपास केलेला आहे. अकलूज पोलीस स्टेशन यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांच्या बोलण्यामधून फारसं काही झालं नाही. म्हणजे किती चोरी झाल्यानंतर पोलीस तपास यंत्रणा सुरू होते, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. त्यामुळे अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोड्या झालेल्यांची माहिती पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी घेऊन सोलापूर वरून खास पथक तयार करून घर फोडींचा शोध घ्यावा असा पीडित महिलावर्गांमधून सूर निघत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर येथे श्री अर्धनारीनटेश्वर विकास पॅनलची प्रतिष्ठेची तर भाईनाथ महाराज परिवर्तन आघाडीच्या अस्तित्वाची लढाई.
Next articleसनदी अधिकारी भाजपच्या धास्तीत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here