वाघोली (बारामती झटका)
राष्ट्रमाता जिजाऊ युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम अकलूज येथील जय शंकर उद्यान येथे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड तालुका शाखा माळशिरस च्या वतीने दि. 12 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस माननीय धैर्यशील मोहिते-पाटील हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय धैर्यशील मोहिते पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे कार्यकारी अभियंता माननीय श्री. तेलंग साहेब, अकलूज नगर परिषदचे मुख्याधिकारी मा. जाधव साहेब, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरसचे उपअभियंता अशोकराव रणनवरे, अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, पंचायत समिती माळशिरसचे गट विकास अधिकारी बी.डी.ओ. खरात साहेब तसेच पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने, तालुका अध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. तदनंतर आर्वी अजित माने, उर्वी अजित माने व पुष्करराजे अमोल माने या लहान मुलांनी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. तदनंतर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्य प्रिया नागणे यांनी जिजाऊ गर्जना सादर केली. या कार्यक्रमावेळी कुमारी अनुष्का चोरमले या बालिकेने मी साक्षात जिजाऊ बोलते हे पथनाट्य सादर केले. तसेच महाराष्ट्र राज्य शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर राजेंद्र कांबळे यांनीही जिजाऊंचा पोवाडा सादर केला. माळशिरस तालुका मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर गायकवाड यांनी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आपले विचार व्यक्त करून जिजाऊंचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. सदर कार्यक्रमातच कार्तिकी चंद्रशेखर गायकवाड यांनी जे. इ. परीक्षेत ९६%टक्के गुण मिळवून एन आय टी नागपूर भारत सरकार चे उपक्रमात प्रवेश मिळाल्याल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने, कार्याध्यक्ष रवींद्र पवार तसेच पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता के एस बाबर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक आक्काताई माने, प्रदेश सदस्य प्रिया नागणे, जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी जगदाळे, जिजाऊ तालुकाध्यक्ष मनोरमा लावंड मॅडम तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते, उपाध्यक्ष डॉ. संकल्प जाधव, सर्व कार्यकारणी सदस्य, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष अजित माने, सेवानिवृत्त क्रुषी अधिकारी भगवान वाघोले, मोहन रेळेकर, लोंढे साहेब तसेच सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आसबे, तात्या बाळासाहेब पवार, उर्मिला देशमुख, माजी अध्यक्ष वनिता कोरटकर, हेमा मुळीक, अजित माने, विठ्ठल कोडग, डॉ. संकल्प जाधव, जमदाडे, सणस, सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम कोविडचे नियम पाळून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार सचिव राजेंद्र मिसाळ यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng