अकलूज येथील इनरव्हील क्लब, उपजिल्हा रुग्णालय, रोटरी क्लब यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रसिध्द हृदयतज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी इनरव्हील क्लबच्या स्तुत्य उपक्रमाचे केले कौतुक

अकलूज (बारामती झटका)

इनरव्हील क्लब अकलूज, उपजिल्हा रुग्णालय अकलूज व रोटरी क्लब अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानाने कुपोषित बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप, फळे व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून प्रसिध्द हृदयतज्ञ डॉ. एम. के. इनामदार उपस्थित होते तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुडे प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी आयएमए अकलूजचे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे, इनरव्हील क्लबचा अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ, सचिव डॉ. अर्चना गवळी, रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. दीपक फडे, सचिव केतन बोरावके आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रवीण शिंदे यांनी कुपोषित बालकांसाठी आहार व त्यांचे आरोग्य यावर मार्गदर्शन केले. तसेच हृदयतज्ञ डॉ. इनामदार यांनी सुद्धा सर्व मुलांना व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन केले व इनरव्हील क्लबचे कामाचे कौतुक केले.

यामध्ये जवळपास २०० कुपोषित बालकांनी याचा लाभ घेतला. त्यांना प्रोटीन पावडर, व्हिटामिन, औषधे, फळे आणि आरोग्यदायी खाऊ वाटप केला. तसेच डॉ. शुभदा पोटे, डॉ. शितल शेटे, डॉ. प्रताप काळे, डॉ. सचिन पाटील यांनी सर्व उपस्थित लाभार्थी मुलांचे मोफतमध्ये तपासणी केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैष्णवी शेटे यांनी केले तर डॉ. अर्चना गवळी यांनी आभार मानले. हा कार्यक्रम अमोलिका जामदार, शितल दळवी, वैष्णवी करटमळ, डॉ. आदिती थिटे या इनरव्हील क्लब मेंबरच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसुप्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांचे सुश्राव्य किर्तन माळशिरस येथे होणार…
Next articleवेळापूर येथे इंगवले देशमुख यांच्या श्री गणेश पेट्रोलियमचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here