अकलूज येथे त्वचा स्किन अँड हेअर क्लिनिकचा शुभारंभ

विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार

अकलूज (बारामती झटका)

अकलूज येथे त्वचा स्किन अँड हेअर क्लिनिक चा उद्घाटन समारंभ विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वा संग्रामनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, ह्रदय रोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, ह्रदय रोग तज्ञ डॉ. रमेश भोईटे, सोलापूर जिल्हा परिषद सदस्या कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, आय.एम.ए. चे अकलूज अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे तसेच बालरोग तज्ञ डॉ. संजीव राणे, स्त्री रोग तज्ञ डॉ. सतिष दोशी, सर्जन डॉ. अरविंद गांधी, त्वचारोग तज्ञ डॉ. एस. एन. कुलकर्णी, युरोसर्जन डॉ. विद्युत शहा, आय स्पेशालिस्ट डॉ. महावीर गांधी, रेडिओलॉजिस्ट डॉ. हेमंत शेट्टी, भूलतज्ञ डॉ. विजय दोशी, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. वैभव गांधी, पॅथॉलॉजिस्ट डॉ. संतोष दोशी, मानसोपचार तज्ञ डॉ. निवांत हराळे, इ.एन.टी. व आय स्पेशालिस्ट किशोर गिरमे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकूंद जामदार, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे माजी सदस्य डॉ. तानाजीराव कदम, निमा माळशिरसचे अध्यक्ष डॉ. प्रविण पाटील, होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने पाटील आदी मान्यवरांसह सर्व आय.एम.ए./डेंटल/निमा/होमिओपॅथी डॉक्टर्स उपस्थित असणार आहेत.

त्वचा स्कीन अँड हेअर क्लिनिकमध्ये पिंपल्स, चेहऱ्यावरील सुरकुत्या, अनावश्यक केस, वांग, पायाच्या चिखल्या, चामखीळ, काळे डाग, सुरमी, मस, गजकर्ण, नागिन, तीळ, कोड, पांढरे डाग, कोरडी त्वचा, खड्डे, सोरायसिस, पायाच्या भेगा, पांढरे चट्टे आदी त्वचेच्या समस्यांवर सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रेडिओ फ्रिक्वेन्सी, केमिकल पिलिंग, स्कीन बायोप्सी, पिआरपी, लेझर ट्रीटमेंट क्रायो थेरपी, क्रोयो स्लश, केमिकल कोटरी मायक्रो ब्लेंडिंग आदी नवीन तंत्रज्ञानयुक्त सुविधा उपलब्ध असणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक शिवाजीराव पवार, डॉ. सुरज पवार (MBBS MD Skin & VD), डॉ. पूजा सुरज पवार (BAMS Ayurvedacharya), राजेंद्र काटकर माजी सरपंच आनंदनगर, रोहन शिवाजीराव पवार (Managing Dir., Aapko Packaging India Pvt Ltd, Pune) यांनी आवाहन केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै. नारायण आबा माने मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
Next articleमराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या समाजासाठी राबविण्यात येणा-या भविष्यकालीन योजनांसाठी लेखी सूचना पाठविण्याचे सारथीचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here