अकलूज (बारामती झटका)
दि.03/05/2022 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अकलूज येथील द्वारका कॉम्प्लेक्स येथे त्वचा विकार तज्ञ डॉ. प्रफुल्ल वसंतराव गायकवाड यांच्या द्वारका केश व त्वचाविकार क्लिनिकचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. श्रीकांत एन. कुलकर्णी सर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील या होत्या.
यावेळी सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्याच्या युगामध्ये आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत असून आधुनिक चिकित्सेसोबत आयुर्वेद चिकित्सा ही महत्त्वाची आहे. त्याची गरज ओळखून त्वचा व केस यांच्या विकारावर त्याची आवश्यकता असून ही काळाची गरज ओळखून डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांनी द्वारका केश व त्वचाविकार क्लिनिक चालू केले याबद्दल त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी सौंदर्य ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी असून त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे, यासाठी कोणीही घरच्या घरी इलाज न करता सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असून ही सेवा अकलूजमध्ये डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांच्या द्वारका केस व त्वचा विकार क्लिनिकमध्ये होणार असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे सांगितले.

सदर क्लिनिकमध्ये सोरियासिस, रुक्ष कोरडी त्वचा, निस्तेज चेहरा, पांढरे कोड, फुटकळ्या, गजकर्ण, लाल चट्टे, चामखीळ, चेहऱ्यावरील वांग, त्वचा काळवंडणे, कुष्ठरोग, ॲलर्जी, अंगाची खाज येणे, पिंपल्स, काळे डाग, हाता पायाला भेगा पडणे, केसांच्या तक्रारी, जळवात, फंगल इन्फेक्शन, केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस विरळ होणे, चाई पडणे, कोंडा होणे, केस रुक्ष होणे इ. विकारांवर सदर क्लिनिकमध्ये औषधोपचार करण्यात येणार आहेत.
या वेळी डॉ. सौ. कुलकर्णी मॅडम, डॉ. अक्षय वाईकर, डॉ. नागनाथ दगडे पाटील, डॉ. अभिजीत राजे भोसले, डॉ. प्रशांत निंबाळकर, डॉ. नितीन कुबेर, डॉ. संजय वाळेकर, डॉ. दादासो काळे, डॉ. फैजल सय्यद, आनंदनगरचे माजी सरपंच वसंतराव जाधव, सदस्य राजेंद्र सोनवणे, सतिश कुंभार, रणजित जाधव, गोरख गवळी, रमजान मुलाणी, श्रीराम ॲग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरी हाके, यादव सर, शिंदे सर, श्रीकांत औषधी भंडारचे मालक अण्णा वैद्य, डॉ. श्रीप्रसाद चव्हाण इनामदार, अंगद जगताप, घोगरे साहेब, पत्रकार गणेश जाधव, गायकवाड, संजय जगदाळे, अनिल कदम, राजेंद्र जगदाळे, संजय शिंदे, समाधान वाघमारे, राजेंद्र जाधव, बच्चन साठे, अविनाश जाधव, नामदेव पवार, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत डॉ. बाळकृष्ण गायकवाड, वसंतराव गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, मल्लिकार्जुन गायकवाड, डॉ. पांडुरंग गायकवाड, डॉ. सौ. मीनाक्षी गायकवाड, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, तहसिलदार सौ. शितल गायकवाड, ऋषीकेश गायकवाड, अमरसिंह गायकवाड व द्वारकाधीश परिवारातील सदस्यांच्या वतीने करण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng