अकलूज ( बारामती झटका )
अकलूज ता. माळशिरस येथे शुक्रवार दि. 21 जानेवारी 2022 रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पोलीस स्टेशन नजिक असणाऱ्या गाय-वासरू चौकामध्ये बारामती ॲग्रोचे मॅनेजर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून चार चाकी गाडीचे दोन लाखाचे नुकसान केलेले आहे. अकलूज पोलीस स्टेशन येथे अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे.
प्रकाश सखाराम जठार मु. पो. वाघापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर हे वरील गावचे मूळ रहिवासी असून सध्या बारामती येथील बारामती ॲग्रोमध्ये मॅनेजर आहेत. जागेची स्थळ पाहणी करण्याकरता अकलूज येथे एम एच 42 एआर 2041 या चारचाकी गाडीने आले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या गाडीचे नुकसान केलेले आहे.

गाडीचा चालक राहुल यादव यांनी दिलेल्या माहितीवरून अकलूज पोलीस स्टेशन येथे तीन अज्ञात इसमांविरोधात भारतीय दंड विधान कलम,324, 341, 427, 34 प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे. अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आर.व्ही. हांडे तपास करीत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng