अकलूज येथे बुध्द महोत्सवाचे आयोजन

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस येथील बुद्ध महोत्सव यंदा शनिवार दि. १४ मे २०२२ पासून सुरू होत असून या तीन दिवसीय महोत्सवात समाज प्रबोधनाचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत, अशी माहिती बुद्ध महोत्सव समितीने दिली आहे.
शनिवारी सकाळी ठीक ९.०० वा. धम्म ध्वजारोहणाने या बुद्ध महोत्सवाची सुरुवात होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ठीक ७.०० वा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसाचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे.

त्यानंतर रविवार दि. १५ मे २०२२ रोजी सकाळी ठीक ८.३० वा. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होणार असून सकाळी ठीक १०.०० वा. अंधश्रद्धाविषयी जागृती करणी, चमत्कारांमागील सत्य हे प्रयोग अंनिसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. विनायक माळी हे सादर करणार आहेत. तर संध्याकाळी ७.०० वा. विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी यांच्या काव्यवाचनाचा आणि ८.०० वा. बोधिसत्व चॅनलचे संपादक सागर कांबळे हे महाराष्ट्रातील बुद्ध लेण्यांविषयीचा कार्यक्रम प्रोजेक्टर द्वारा सादर करणार आहेत.

सोमवार दि. १६ मे २०२२ रोजी म्हणजेच बुद्ध पौर्णिमा निमित्त पहाटे ५.०० वा. सुप्रसिद्ध आंबेडकरी गायक विजय सरतापे आणि संच यांचा बुद्ध पहाट हा कार्यक्रम आयोजित केला असून सकाळी ठीक ८.०० वा. धार्मिक विधी होणार आहेत. त्यानंतर ठीक ९.०० वा. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण आणि सामुहिक बुद्ध वंदना घेतली जाणार आहे. ठीक ५.०० वा. संपूर्ण शहरातून बुद्ध प्रतिमेची सजवलेल्या रथातून मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर रात्री ठीक ८.०० वा. स्नेहभोजनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.

सदर कार्यक्रम पारनेर येथील भंतेजींच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस येथे मंगळवारी दि. १० मे रोजी रिपाइंचे वतीने आंदोलन
Next articleइंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सचिव पदी विलास दत्तात्रय ताटे – देशमुख यांची निवड…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here